शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

२०९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 11:14 PM

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाची कारवाई : नियमित शिक्षक नसल्याने ८२ महाविद्यालयांना धक्का, विद्यार्थ्यांनो सावध व्हा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरु झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०९ संलग्नित महाविद्यालयांत प्रवेशबंदी केली आहे. संलग्नीकरणासाठी अर्ज न करणे तसेच ‘एलईसी’ची (लोकल इन्क्वायरी कमिटी) प्रक्रिया न राबविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असे सांगत विद्यापीठाने यांची यादीच संकेतस्थळावर जाहीर केली आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील ९८ महाविद्यालयांनी निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज केले नाहीत. यातील अनेक महाविद्यालये अनेक वर्षांपासून केवळ कागदांवरच आहेत. शिवाय महाविद्यालयांना सातत्याने ‘एलईसी’ची प्रक्रिया राबवून घ्यावी लागते.विद्यापीठात नियमांनुसार प्राध्यापक तसेच इतर सोईसुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठातर्फे ‘एलईसी’ नेमण्यात येते. मात्र महाविद्यालयांना संबंधित समितीला बोलवावे लागते. यासंदर्भात २९ महाविद्यालयांनी कुठलीही हालचाल केलेली नाही. या महाविद्यालयांना वारंवार विचारणादेखील करण्यात आली. मात्र तरीदेखील काही फरक पडलेला नाही. ८२ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले आहेत.मागील वर्षीदेखील लावली होती प्रवेशबंदीनागपूर विद्यापीठाने या महाविद्यालयांना वारंवार इशारा दिला होता. संबंधित महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आली होती. मागील वर्षीदेखील अगोदर ७४ व त्यानंतर ४० महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावण्यात आली होती. जर मागील वर्षीच प्रवेशबंदी लावली तर त्यांचे संलग्नीकरण कायमस्वरुपी रद्द का करण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नामांकित महाविद्यालयांचा समावेशप्रवेशबंदीच्या या यादीमध्ये नागपुरातील अनेक नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे. शिक्षक, कर्मचारी नसल्यामुळे अनेक मोठ्या महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी लावण्यात आली आहे.शिक्षक, कर्मचारी व सुविधा नसल्यामुळे या महाविद्यालयात प्रवेशबंदीअशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, पहेला, भंडारा (बीकॉम)गीताचार्य तुकारामदादा आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, लाखांदूर, भंडारा (बीएस्सी, बीकॉम)पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय, वरठी, भंडारा (एमए-मराठी, इतिहास, समाजशास्त्र)एस.चंद्रा महिला महाविद्यालय, साकोली, भंडारा ( बीएस्सी)निर्धनराव पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आंधळगाव, भंडारा (बीकॉम, बीएस्सी)भारत सेवक सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोंढा, भंडारा (बीकॉम, बीएस्सी)सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पवनी, भंडारा ( बीएस्सी-गृहविज्ञान)प्रचिती महिला महाविद्यालय ,मोहाडी, भंडारा (बीएस्सी-गृहविज्ञान)इंदुताई मेमोरिअल बॅचलर आॅफ लायब्ररी अ‍ॅन्ड इन्फॉर्मेशन सायन्स कॉलेज, तुमसर, भंडारा (बी.लिब., एम.लिब., सी.लिब., बीजे)‘एलईसी’ प्रक्रिया न राबविल्यामुळे प्रवेशबंदीजान्हवी कॉलेज आॅफ होम सायन्स, लाखांदुर, भंडारा़निर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज आॅफ एज्युकेशन, तुमसरनिर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज आॅफ एज्युकेशन, साकोलीनिर्धनराव पाटिल वाघाये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकोलीज्ञानेश्वर मेंघरे शिक्षण महाविद्यालय, भंडारा़़निर्धन पाटिल वाघाये शिक्षण महाविद्यालय, लाखनीलक्ष्मीबाई आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, तुमसरलक्ष्मीबाई बीबीए अ‍ॅन्ड बीसीए कॉलेज, लाखांदुरतिरुपति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखनीतिरुपति आर्टस, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, लाखांदुरआदिलोक महिला बीएड कॉलेज, गोरेगांवसंलग्निकरणासाठी अर्ज नसल्यामुळे प्रवेशबंदीवैनगंगा इन्स्टिटयूट आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज, साकोलीमनोहरभाई पटेल कॉलेज आॅफ एज्युकेशन, भंडाराडॉ अरुण मोटघरे मास्टर आॅफ एज्युकेशन, भंडाराहरीश मोरे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,भंडाराश्री साई बीएड कॉलेज, भंडारा़पुंडलिकराव तिरपुड़े कॉलेज आॅफ एज्युकेशन, लाखनी, भंडारानवयुवा महाविद्यालय, भंडाराअनुराग शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मोहाडी,भंडारा़महाराणा प्रताप कॉलेज आॅफ एज्युकेशन, भंडारा़विद्यानिकेतन कॉलेज, भंडारा़विद्याभारती कॉलेज, तुमसरडॉ. मालतीताई उमाठे कॉलेज, भंडारास्व.़निर्धनराव पाटिल वाघाये कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साकोलीतिरुपति कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडाराविनोद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पवनीडोमाजी जांभुळकर टेक्निकल कॉलेज, साकोलीनर्मदाबाई ठवकर कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड मॅनेजमेन्ट, भंडारातिरुपति आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायंस कॉलेज, लाखांदुऱनिर्धनराव पाटिल वाघाये कॉलेज, साकोलीनिर्धनराव पाटिल वाघाये बीबीए कॉलेज, पालांदुर