औचित्य जागतिक महिला दिनाचे : गणेशपूर ग्रामपंचायतीचा पुढाकारभंडारा : वंशाचा दिवा म्हणून मुलाला पसंती दिली जाते. मात्र, आता मुलापेक्षा मुलगी बरी, असा संकल्प अनेक पालकांकडून व्यक्त होत आहे. गणेशपूर येथे ज्या मातांनी मुलींना जन्म दिला अशा तब्ब्ल २० मातांचा ग्रामपंचायतीच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. असा पुढाकार घेणारी गणेशपूर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ग्रामपंचायत गणेशपूर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच वनिता भूरे, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, पंचायत समिती सदस्य वर्षा साकुरे, महिला समुपदेशन केंद्राच्या जिल्हा समन्वयक मृणाल मुणेश्वर, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता कारेमोर, संध्या बोदेले, किर्ती गणवीर, सुधा चवरे, माधुरी देशकर, मधुमाला बावणउके, सुभद्रा हेडाऊ, विणा भोंगाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सरपंच वनिता भूरे यांनी, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्व महिलांनी त्यांचे विचार आणि कृती आत्मसाद करावी. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन जीवनात बदल घडवून आणावे. चूल आणि मुल या पलिकडील जीवन जगण्यासाठी महिलांनी शिक्षण घेऊन त्याचा लाभ इतरांनाही द्यावा, यातून महिलांची निश्चितच प्रगती होईल, असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी, महिलांनी आर्थिकदृष्ट्या सबळ होण्याची गरज आहे. महिला आता पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात प्रगती करीत आहे. ही महिलांसाठी अभिमानाची बाब आहे.महिला दिनानिमित्त महिलांसाठी योजनांची योग्य अंमलबजावणी करून महिलांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. यावेळी मुणेश्वर यांनी, महिलांनी घाबरून न जाता वेळप्रसंगी महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा लाभ घ्यावा. रोजगारातून ज्या महिलांनी स्वत:ला सिध्द केले आहे, अशांची प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन संध्या बोदेले यांनी केले. प्रास्ताविक किर्ती गणवीर यांनी केले. तर आभार दामिनी सळमते यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. गणेशपूर ग्रामपंचायतीने घेतलेला हा पुढाकार मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी नक्कीच लाभदाय ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)या मातांचा केला सत्कारडिसेंबर २०१६ ते मार्च (२०१७) महिन्याचा पहिला आठवडा या दरम्यान गणेशपूर येथे ज्या मातांनी मुलींना जन्म दिला अशा २० मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या मातांमध्ये मंजू खोत, शितल शेंडे, योगेश्वरी हरडे, मोनाली जिभकाटे, ज्योत्सना नंदनवार, राजश्री कारेमोरे, प्रियंका बडवाईक, किरण बडवाईक, सागरीका सिल्लारे, मानसी ठमके, दिपीका बारई, लता कटरे, मीता उमरे, प्रीती चकोले, मनिषा उखरे, बाली वाहाणे आदींचा समावेश आहे.
२० ‘सुकन्या मातांचा’ केला हृद्य सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 12:29 AM