शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

२० वर्षांपासून किसन घरकुलाच्या प्रतीक्षेत

By admin | Published: June 07, 2017 12:28 AM

अठरा विश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो.

पालोरा येथील प्रकार : घरावर ताडपत्री टाकून वास्तव्य लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : अठरा विश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या लाभार्थ्याला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. मात्र पालोरा ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत समितीच्या सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे गरजू लाभार्थ्यांना यातून वगळले जात आहे. यात येथील भूमिहीन व गरजू लाभार्थी किसन प्रमेश्वर रंगारी हा मागील अनेक वर्षापासून पडक्या घरावर ताडपत्री टाकून कुटुंबासह वास्तव्य करीत आहे. पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पालोरा येथे २०११ मध्ये पंतप्रधान आवास योजनेकरिता लाभार्थ्यांची पाहणी करण्यात आली. या अंतर्गत पुन्हा २०१५ -१६ ला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून यादी प्रकाशित केली. या यायादीमध्ये २१ लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. यातील चार लाभार्थ्यांचे कागदपत्रे मागविण्यात आले. या २१ लाभार्थ्यांपैकी बऱ्याच लाभार्थ्यांचे राहते घर पक्के आहेत. अनेकांकडे उत्पादनाचे साधन आहे. अनेक लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीवर कार्यरत आहेत. मात्र पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना किसन ताडपत्रीच्या घरात वास्तव्य करीत असताना त्यांना किसन घर दिसले नाही. या यादीमध्ये अनेक लाभार्थी धनाढ्य आहेत. ग्रामसभेत गरजू लाभार्थ्यांचे नाव देऊन सुद्धा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नसेल तर गावातील ग्रामसभेचे महत्व काय? घराची पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबाकडे का दुर्लक्ष केले. ज्या लाभार्थ्यांकडे रिकामी जागा आहे. मात्र पक्के घर बांधायला पैसे नाहीत असे अनेक लाभार्थी दुसऱ्याच्या घरी किरायाने राहत असून अनेकांनी नातेवाईकांचा आसरा घेऊन राहत आहेत. किसनच्या घराची परिस्थिती बेताची आहे. जीव मुठीत घेऊन हे कुटुंब वास्तव्य करीत आहे. पावसाळ्यात संपूर्ण घराला ओलावा असतो. घराच्या सभोवतालच्या भिंती कोसळल्या आहेत. छताचे खापरे फुटलेले असून लाकडी साहित्य कुजलेले आहेत. यासाठी ग्रामपंचायततीकडे मागणी करून सुद्धा याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप किसनने केला आहे. राहते घर कोसळून पडल्यावर व एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का? यातरी वर्षात आपले नाव घरकुल योजनेत येईल व आपलेही पक्के घर होईल, हे स्वप्न घेऊन किसन मागील २५ वर्षापासून घरावर ताडपत्री टाकून राहत आहे. राहते घर जीर्ण झाल्यामुळे ते केव्हाही कोसळू शकते, त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन किसनला घरकुल योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.शौचालय योजनेचाही लाभ नाहीज्या लाभार्थ्याकडे शौचालय नाही, अशा लाभार्थ्यांना प्रशासनाची कोणतीही योजना देण्यात येणार नाही म्हणून आदेश आहेत. भारत स्वच्छ अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांकडे शौचालय नाही अशा लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याकरिता १२ हजाराचे अनुदान देण्यात येत आहे. मात्र ही योजना सुद्धा किसन लाभार्थ्यांपासून कोसो दूर ठरली. शौचालय नाही, घर नाही, शासन दुकानातून कोणतेही अन्न धान्य मिळत नाही. प्रशासनाच्या योजना कुणासाठी आहेत हे या लाभार्थ्यांला पाहिल्यास कळत आहे.