शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

जिल्ह्यात ३३ दिवसात २०१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 11:00 PM

जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : रोवणीच्या कामाला वेग, जलसाठ्यांची स्थिती मात्र कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ३३ दिवसात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी खरा पाऊस हा गत आठवड्यातीलच आहे. तब्बल महिनाभराच्या दडीनंतर पावसाचे आगमन झाले असून गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.भंडारा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते ३ जुलै पर्यंत २३८.७ मिमी पाऊस कोसळतो. मात्र सध्या जिल्ह्यात या कालावधीत २०१.५ मिमी पाऊस कोसळला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही याच कालावधीत २३१.७ मिमी पाऊस कोसळला होता. १ ते ३ जून पर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी ८४ टक्के आहे.भंडारा तालुक्यात आतापर्यंत २३१.३ मिमी, मोहाडी २१७.३ मिमी, तुमसर २७३.८ मिमी, पवनी १४८.१ मिमी, साकोली २१५.२ मिमी, लाखांदूर १७५.७ मिमी, लाखनी १४९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात कोसळला आहे. समाधानकारक पावसाने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता धान रोवणीच्या कामाला लागला आहे. जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी अद्यापही जलसाठ्यात कोणतीच वाढ झाली नाही.गोसेखुर्द प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा अद्यापही निरंक आहे. या प्रकल्पाचा एकुण साठा १४६.०८ दलघमी आहे. तर उपयुक्त पाणी साठा ७४०.१७ दलघमी आहे. पाणलोट क्षेत्रात ११३ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी या प्रकल्पाच्या पाण्यात कोणतीही वाढ झाली नाही.२४ तासात ६० मिमी पाऊसभंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६०.०३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात ८९.२ मिमी तर सर्वात कमी पाऊस भंडारा तालुक्यात ४० मिमी कोसळला. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.