लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : राजनांदगावहून लाखांदूरकडे येणाºया ट्रकची झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू असल्याचे दिसून आल्याने तब्बल २१ लक्ष ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ट्रकही जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चौकशीत असून अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.लाखांदूर तालुक्यात पर राज्यातून सुगंधीत तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची गुप्त माहिती लाखांदूर पोलिसांना होती. काल सायंकाळी अर्जुनी/मोरगाव कडून असाच एक ट्रक क्रमांक एम. ३१ एपी. ४६५५ हा सुगंधीत तंबाखू घेऊन लाखांदुरकडे येत असल्याची कुणकुण लाखांदूर पोलिसांना लागली. लगेच पिंपळगाव मार्गावर पोलिसांनी गस्त लावून सायंकाळच्या दरम्यान ट्रक थांबवून तपासणी केली असता जवळपास अर्धा ट्रक सुगंधीत तंबाखू पिशव्यामध्ये भरलेला आढळला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून दुसºया दिवशी सकाळी ट्रकमधील सुगंधीत तंबाखूचे पाकिट मोजले असता मजा १०८ हुक्का व तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखू, २०० ग्राम ३३ पेटी, ५०० ग्राम ४ पेटी, ५० ग्राम ७ पेटी, व ईगल ८० पोते असा हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखू किंमत २० लक्ष ४४ हजार ,७२५ लक्ष व ट्रक किंमत १० लक्ष असा एकूण ३० लक्ष ४४ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रक चालक मिलिंद चिरकूट माटे (४०) रा. एकता कालोनी नागपूर याला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रक चालकाच्या माहितीवरून तंबाखू, व अन्य पदार्थ लाखांदूर येथील एका किराणा दुकानदाराच्या सांगण्यावरून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथून आणल्याचे सांगण्यात आले.हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखूचे हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाचे असल्याने लाखांदूर पोलिसांनी माहिती देऊन बोलावून घेतले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभाग भडाराचे निरीक्षक देशपांडे, अ. दा. राऊत यांनी संपूर्ण प्रकरणाची पाहणी करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. आता हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे असून हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखु हे शासन मान्य आहे की नाही हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तपासणी अहवालाकडे लाखांदूर वासीयांचे लक्ष लागले आहे.संपूर्ण मुद्देमाल हा अन्न व औषध प्रशासन विभाग भंडाराच्या ताब्यात देण्यात आला आहे. मागील वर्षी हाच हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखु अन्न व औषध प्रशासन विभाग भंडाराने लाखांदूर येथील एका किराणा दुकानावर धाड घालुन पकडला होता. यावेळी त्या दुकानदारावर गुन्हा दाखल केला होता.जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी टिक्कस, पोलीस निरीक्षक सुरेश धूसर यांच्या मार्गदर्सनात पोलीस निरीक्षक डी. मंडलवार, पोलीस उपनिरीक्षक निंबेकर, पोलीस नायक वडेटवार, चेटूले, मादाडे, वलके, पो.शिपाई बोरकर, कापगते, कठाणे यांनी कामगिरी पार पाडली.गुप्त माहितीच्या आधारावर हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का व शिशा तंबाखूचा ट्रक पकडला. मात्र हा सुगंधित तंबाखू शासन मान्य आहे की नाही हे ठरविण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहेत, तपासाअंती अहवाल आल्यावरच कारवाई होईल.-डी. मंडलवार, पोलीस निरीक्षक लाखांदूरलाखांदूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला हुक्का व शिशा तंबाखू, ईगल व हुक्का वशिशा तंबाखू हा परराज्यातून आला आहे. हे साहित्याची नागपूर येथील प्रयोग शाळेतून जोपर्यंत तपासणी अहवाल प्राप्त होत नाही तो पर्यंत पुढील कारवाई करता येणार नाही. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.- एस. देशपांडे, निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग
२१ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:41 PM
राजनांदगावहून लाखांदूरकडे येणाºया ट्रकची झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू असल्याचे दिसून आल्याने ....
ठळक मुद्देगुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई : वाहनचालक ताब्यात, तपासणी साहित्य नागपूर प्रयोगशाळेत पाठविणार