बाॅक्स
शुक्रवारी १५ मृत्यू, १०३१ पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात शुक्रवारी १५ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. तर १०३१ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. मृत्यू झालेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील पाच, लाखनी तीन, माेहाडी एक तर पवनी, साकाेली आणि लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. १०३१ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये भंडारा तालुक्यातील ३३३, माेहाडी ४६, तुमसर ८६, पवनी ९२, लाखनी १५४, साकाेली २३१, लाखांदूर तालुक्यातील ८९ व्यक्तींचा समावेश आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात आतापर्यंत ८३२ जणांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात काेराेनाने ८३२ जणांचा बळी घेतला. त्यात भंडारा ४७, माेहाडी ७५, तुमसर ९०, पवनी ८८, लाखनी ६४, साकाेली ६९ आणि लाखांदूर तालुक्यातील ३९ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर १.६४ टक्के आहे.
बाॅक्स
जिल्ह्याने गाठली ५० हजारांची संख्या
भंडारा जिल्ह्यात एकूण काेराेना बाधितांची संख्या आता ५० हजार ७०४ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात २१ हजार ८६५ आढळून आले हाेते. माेहाडी ३९०२, तुमसर ६२६२, पवनी ५४२८, लाखनी ५५०३, साकाेली ५२१० आणि लाखांदूर तालुक्यात २५३३ रुग्ण आढळून आले हाेते. त्यापैकी ३८ हजार ६३० व्यक्तींनी काेराेनावर मात केली आहे.