लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे शारदा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करताना २३ वर्षीय युवकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबरला दुपारी १:३० वाजताच्या सुमारास घडली. चेतन देवराम नागोसे असे मृत युवकाचे नाव आहे.
जैतपूर येथे सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाकडून देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. बुधवारी मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली होती. यात अनेक गावकरी सहभागी होते. गावाजवळील तलावात या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गावकरी पाण्यात उतरले असता चेतनही पाण्यात उतरला. मात्र खोल पाण्याच्या अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच दिघोरी मोठीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांनी घटनास्थळी पोहोचून एंकेश चव्हाण, महादेव वरखेडे, शिवशंकर भोपे, राम सतिमेश्राम, सूर्यभान मेश्राम यांच्या सहकार्याने चेतनचे शव पाण्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.
गावावर शोककळाया घटनेमुळे गावावर शोकळा पसरली आहे. घटनेची माहिती कळताच शेकडोंनी तलावाकडे धाव घेतली. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, बहीण असा परिवार आहे.