चंदन मोटघरे
लाखनी : तालुक्यात २० ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. आजची रात्र उमेदवारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न उमेदवारांचा असणार आहे. तालुक्यातील २४ हजार ५०८ मतदार दि. १५ जानेवारीला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी १२ हजार २३८ मतदार पुरुष आहेत, तर स्त्री मतदारांची संख्या १२ हजार २६९ आहेत. स्त्री मतदारांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे.
तालुक्यात २० ग्रामपंचायतसाठी ६५ मतदान केंद्रावर निवडणूक पार पडणार आहे. तालुक्यातील सोमलवाडा /मेंढा ग्रामपंचायतमध्ये १,७६९ मतदार मतदान करणार आहेत. परसोडी १,०६१, सिंदीपार (मुंडीपार) १,२८४ , पोहरा ४,३१०, रेंगोळा १,१५४, किन्ही ७४२, दैतमांगली ६४५, रेंगेपार (कोठा) १,८१६, धाबेटेकडी ७९०, शिवनी १,१४३, रामपुरी (नान्होरी) ८१८, डोंगरगाव (साक्षर) ६०३, सोनमाळा ७९८, चान्ना १,२९९, झरप १,०३३, लोहारा (नरव्हा) १,६३५, सिपेवाडा ६७०, याप्रमाणे मतदार संख्या आहे.
तालुक्यातील २० ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्राची मतदार केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत व्हीव्हीपॅडचा उपयोग केला जाणार नाही. अनेक प्रभागांत दोन किंवा तीन उमेदवारांना निवडून द्यावयाचे आहे. तालुक्यातील २० ग्रामपंचायतमध्ये ६१ प्रभागांत निवडणूक पार पडणार आहे.
कोट बॉक्स
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना मास लावल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. कोविड प्रादुर्भाव असल्यामुळे कोविड रुग्णांना व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शेवटच्या एक तासात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
ओळखपत्र व इतर पुराव्याशिवाय मतदान करता येणार नाही. दारुड्या व्यक्तींनी मतदान केंद्रात प्रवेश केला, तर कारवाई करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पुरेशा सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.
* मल्लिक विरानी
तहसीलदार व निवडणूक अधिकारी लाखनी