चप्राड पहाडी मंदिर परिसरात अतिक्रमण : तहसीलदारांकडे ग्रामपंचायतीची तक्रार लाखांदूर : तालुक्यातील चप्राड पाहाडीवरील दुर्गा मंदिर प्रसिद्ध असून दररोज हजारो भक्त दर्शनाकरिता येतात. नुकताच पर्यटन स्थळ म्हणून शासनाने या स्थळाला भरपूर निधी उपलब्ध करून विकास कामे केली. संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र परंतु पायथ्याशी पंप हाऊस जवळील जागेवर एका व्यक्तीने चक्क २५ मोठ्या सागवान झाडांची सर्रास कत्तल केल्याने ग्रामपंचायतीने त्यावर कार्यवाहीची मागणी केली. चप्राड पहाडी दुर्गा मंदिर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले. भरपूर निधी उपलद्ध करून विकास कामे केली. भक्त निवास, सिमेंट रस्ते, नाली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. हा परिसर खूप मोठा असल्याने खाजगी शाळा, ग्रामपंचायत, सेवाभावी संथा, बचत गट यांनी मोठ्या प्रमाणात गट न. ७ मध्ये पाहाडीच्या पायथ्याशी वृक्ष लागवड केली. संपूर्ण परिसर हिरवेगार दिसू लागले. परंतु पायथ्याशी पंप हाऊस जवळील जागेवर एका व्यक्तीने चक्क २५ मोठ्या सागवान झाडांची सर्रास कत्तल करून जवळपास एक एकर जागेवर अतिक्रमण करून काटेरी कुंपण केल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली. ग्रामपंचायत सदस्य सोमेश्वर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण जागेची पाहणी केली. लगेच तालाठीकडे तक्रार देत संपूर्ण चौकशी व अतिक्रमण धारकांवर कारवाईची मागणी केली आहे. (तालुका प्रतिनीधी)
२५ सागवृक्षांची अवैध कत्तल!
By admin | Published: August 19, 2016 12:40 AM