शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

भाजीपाला लागवडीतून अडीच लाखांचा नफा

By admin | Published: August 22, 2016 12:31 AM

तालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे.

चवळा व कारल्याची लागवड : पटले दाम्पत्यांची दारिद्र्यावर मातचंदन मोटघरे लाखनीतालुक्यातील मोरगाव (राजेगाव) येथील मनोहर बैललाल पटले यांनी अल्पशा शेतीवर बाराही महिने भाजीपाल्याची लागवड करून दारिद्र्यावर मात केली आहे. दरवर्षी तीन लक्ष रूपयापर्यंत शुद्ध नफा भाजीपाला लागवडीतून मिळवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. संयुक्त कुटुंबापासून २००४ मध्ये वेगळे झाल्यानंतर मनोहर पटले व त्यांच्या अर्धांगिणी प्रतीभा पटले यांना संघर्ष करावा लागला. दीड एकर शेतीमध्ये धान पिकाची लागवड केली. पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. २००७ पासून शेतात उन्हाळी भेंडी लावायला सुरुवात करून भाजीपाला लागवडीकडे लक्ष पुरविले. कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन भाजीपाल्याच्या इतर जातीची लागवड केली. प्रारंभी पटले यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. दुसऱ्याच्या शेतीवर मजुरीसाठी जावे लागत होते. भाजीपाला लावगडीनंतर पटले यांच्या जीवनस्तरामध्ये बदल घडून आला. भाजीपाला भंडारा व नागपुरच्या भाजीमंडीमध्ये जावू लागला. पटले यांच्याकडे सध्या दोन मालवाहू गाड्या आहेत. मोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांचा भाजीपाला पावसाळ्यात भंडारा व उन्हाळ्यात नागपूर येथे जात असते. पटले यांच्यासोबत त्यांना इतर शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देवून विकास साधला आहे. २०१५-१६ मध्ये मनोहर पटले यांना कृषी विभागाद्वारे ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचनाची योजना मिळाली आहे. शेतात विंधन विहिर आहे. बाराही महिने मुबलक पाण्याचा पुरवठा होत असतो. २०१६ मध्ये पटले यांनी चवळा व कारल्याचे उत्पादन ४० आर शेतात घेतले. चवळा व कारला लावल्यामुळे ४ लक्ष ७५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. त्यांची बि बियाणे, खत, कीटकनाशके, मशागत खर्च, मजुरी इत्यादीसाठी २ लक्ष २५ हजार रुपये खर्च आला. त्यांना ४ महिन्यात २ लक्ष ५० हजार रुपयाचा शुद्ध नफा मिळालेला आहे. पटले यांनी शेतात चवळा व कारल्यासोबत लवकी व काकड्यांची लागवड केली आहे. उन्हाळ्यात भेंडीचे उत्पादन घेतले जाते. मनोहर पटले यांचा भाजीपाला लागवडीमुळे जीवनस्तर उंचावलेला आहे. मनोहर पटले यांच्या पत्नी प्रतीभा पटले या शेतात मेहनत घेत असतात. मनोहर पटले बाजारपेठेकडे लक्ष देतात. पटले पती पत्नी यांनी मेहनत व कौशल्याच्या मदतीने दारिद्र्यावर मात केली. त्यांच्या दोन मुली शालेय शिक्षण घेत आहेत. परंपरागत पीक पद्धतीला फाटा देवून भाजीपाल्याची लागवड करून मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांपुढे आदर्शाचा मानदंड निर्माण करणारे मनोहर पटले शांत स्वभावाचे आहेत. त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल कौतूक केल्या जात आहे.