लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून त्यासाठी नामांकन दाखल करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. वृत्त लिहीपर्यंत ८८२ जागांसाठी २७३३ जणांनी नामांकन दालख केले होते. विविध अडचणींवर मात करीत उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी सबंधीत तहसील कार्यालयात बुधवारी अलोट गर्दी केली होती. भंडारा तहसील कार्यालयातही सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीमध्ये भंडारा ३५, मोहाडी १७, तुमसर १८, लाखनी २०, साकोली २०, लाखांदूर ११ आणि पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीची निवडणूक होवू घातली आहे. यासाठी नामांकनाला २३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. परंतु ऑनलाईन अर्जप्रक्रीया आणि जातवैधता प्रमाणपत्रासोबत नामांकन दाखल करणे बंधनकारक होते. त्यामुळे अनेकांना अडचणीचे जात होते. त्यातच इंटरनेटची गती कमी आणि सर्व्हर डाऊन रात असल्याने अडचणीत वाढ झाली होती. दरम्यान नामांकनातील अडचणी लक्षात घेता आयोगाकडून पारंपारिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईनद्वारे नामांकन दाखल करण्याची संधी देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत नामांकनाची संपूर्ण आकडेवारी मात्र मिळू शकली नाही.
१५ जानेवारी रोजी फैसलाजिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी संबंधीत तहसीलदार निश्चित करतील त्याठिकाणी १८ जानेवारी रोजी होणार आहे. निवडणुकीने वातावरण तापत आहे.