साकाेलीजवळ झालेल्या २२ लाख ५० हजारांच्या वाटमारीतून आंतरराज्यीय तांदूळ तस्करीचे प्रकरण पुढे आले हाेते. सुरुवातीला साकाेली पाेलिसांनी या प्रकरणात माेठ्या शिताफीने चाैकशी सुरू केली हाेती. पुरवठा विभाग आणि आयकर विभागाकडून अहवाल मागविण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र, आंधप्रदेशातील अण्णाचे साकाेली ठाण्यात बयाण झाले आणि प्रकरणाने वळण घेतले. यानंतर कुणीही बाेलायला तयार नाही. प्रकरणही केवळ वाटमारीपुरतेच मर्यादित ठरले. या प्रकरणात नेमके काय झाले, याची उघड चर्चा आता साकाेलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हाेत आहे. या प्रकरणात ३० लाख रुपयांची माेठी मांडवली झाल्याची खात्रीलायक माहिती असून, यात अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. त्यामुळेच एवढ्या माेठ्या तांदूळ तस्करीचे प्रकरण उघड हाेऊनही ते केवळ वाटमारीवर येऊन थांबले.
तांदूळ तस्करप्रकरणी ३० लाखांची मांडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:37 AM