शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

३०० एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत, शेतकरी होत आहेत भूमीहीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:16 PM

नदीकाठ भूस्खलनाने वाढतोय : प्रवाह येतोय गावाच्या दिशेने, प्रशासन बेफिकीरच !

मोहन भोयरतुमसर : बेसुमार रेती उपशामुळे नदीचे पात्र तुमसर तालुक्याच्या उमरवाडा, बोरी व कोष्टी या गावाच्या दिशेने सखल झाले आहे. दरवर्षी पुरामुळे नदीकाठ भूस्खलन होत असून प्रचंड वेगाने शेती नदीत समाविष्ट होत आहे. एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली आहे. दरवर्षी नदीकाठ भूस्खलन होत असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे तात्काळ संरक्षण भिंतीचे बांधकाम न केल्यास येत्या काही वर्षात ही तीन गावे नदीपात्रात समाविष्ट होण्याच्या धोका आहे.

तालुका मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी उमरवाडा व कोष्टी या गावाच्या दिशेने झपाट्याने वैनगंगेचे नदीपात्र पुढे सरकत आहे. त्यामुळे या तिन्ही गावांना धोका निर्माण झाला आहे. मागील वीस वर्षापासून नदीचे पात्र गावाच्या दिशेने झपाट्याने पुढे सरकत आहे. परंतु प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. एकट्या बोरी येथे सुमारे ३०० एकर शेती मागील २० वर्षात वैनगंगा नदीने गिळंकृत केली आहे. विनोद साखरवाडे या शेतकऱ्याची तर बारा एकर शेती नदीपात्रात समाविष्ट झाली. रोशनलाल मेश्राम यांची दहा एकर शेती नदीपात्रात गेली, दोन एकर तसेच तीन एकर अशी शेतकऱ्यांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट झाली. शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी पुरात येथील शेतीमधील पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

नदीचा प्रवाह का वळला ?तुमसर व तिरोडा हे दोन्ही तालुके या नदीपात्राच्या काठावर आहेत. तुमसर व तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूच्या उपसा दरवर्षी केला जातो. त्याच्या परिणाम असा झाला की तुमसर तालुक्याच्या दिशेने नदीचे पात्र है सखल झाले असून एक ते दीड किलोमीटरच्या मोठा खट्टा येथे पडला आहे. पावसाळ्यात नदीच्या प्रवाह त्या सखलभागातून तुमसर तालुक्यातील गावाकडे वळणे सुरू झाले.

अनिल बावनकर यांनी केले होते प्रयत्न२०१० - ११ मध्ये आमदार अनिल बावनकर यांनी राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांना बोरी येथे वैनगंगेच्या नदी काठावर पाहणी करिता घेऊन आले होते. त्यांनी संरक्षण भिंत बांधण्याकरिता निधी देता येईल काय व एवढ्या विस्तीर्ण नदीला संरक्षण भिंत बांधण्यासंदर्भात सचिव स्तरावर चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यानंतर मात्र कोणतीही चर्चा झाली नाही.

नदीपात्र बदलण्याची गरजउन्हाळ्यात या गाव परिसरातील नदीचे पात्र उपसा करून समतल करण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचा तालुक्यातील गावाकडील सखल भाग हा समतोल होईल. तसेच या गावाच्या दिशेने सुमारे दीड तो दोन किलोमीटर संरक्षण भित बांधल्यास नदीकाठाचे भूस्खलन होणार नाही. त्या करीता सुमारे ३० ते ३५ कोटी निधीची गरज आहे. हा निधी खेचून कोण आणणार, असा प्रश्न आहे. 

टॅग्स :bhandara-acभंडारा