मुख्य कालवा फुटला : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणीमोहन भोयर तुमसरमागील ३५ वर्षानंतर बावनथडी प्रकल्प अंतर्गत आठ गावांना प्रथमच सिंचनाचा लाभ झाला. बावनथडी प्रकल्पाचा फूटलेल्या मुख्य उजवा कालव्याची पाहणी करिता सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. सिंचन मंत्र्याच्या दालनात समीक्षा बैठक झाल्यानंतर अधिकऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेटी दिल्या हे विशेष. सिंचन क्षमता तथा इतर बाबींची चौकशी त्यांनी केली. ७७ गावांपपैकी ४६ गावे सिंचनाखाली आली असून ३१ गावे सिंचनापासून वंचित आहेत.२० दिवसापूर्वी खरीप पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. मुख्य कालवा ० ते ८ कि़मी. दरम्यान मुख्य कालव्याला मोठे भगदाड पडले होते. हा प्रकार आलेसुर गावाजवळ घडला होता. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मशीन्सने हा कालवा दुरूस्त केला. ३० सप्टेंबरपर्यंत १७५३७ हेक्टरपैकी ४६ गावातील ९८२६ हे, शेतीला सिंचनाची सोय झाली. एकूण ७७ गावांना सिंचनाचा लाभ येथे मिळणार आहे. ३५ वर्षानंतर कारली, आसलपानी, शिवनी, पिंपळगाव, धर्मापूरी, खैरी को., इंदूरखा, मोहाडी या गावाला सिंचन करण्यात आले. ४६ गावांना सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यात तुमसर तालुक्यातील ३७ तर मोहाडी तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे. मांडवी, चिखली, कुरमुडा, डोंगरी बु., चांदमारा, गर्रा, आंबागड, हरदोली, टाकला, हिंगना, काटेबाम्हणी, हसारा, सालई विहीरगाव, खापा, मांगली, तामसवाडी, तुडका, देव्हाडी, परसवाडा, मांढळ, खरबी, पांजरा, दावेझरी, रामपूर,नेरला, आंधळगाव, सालई खुर्द, उसर्रा, टांगा, पालडोंगरी, भिकारखेडा, डोंगरगाव, कळमना, कुसारी, एकलारी, रोहणा, रोहा, बेटाळा ही गावे सिंचनाखाली आली आहेत.२८ सप्टेंबरपासून आ. चरण वाघमारे यांच्या सुचनेनुसार बावनथडी प्रकल्पातून बघेडा जलाशयात पाणी सोडणे सुरू आहे. कारली जलाशयात पाणी भरणे तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होत आहे. सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे, आ. चरण वाधमारे, अधिक्षक अभियंता जयंत गवई, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम, उपविभागीय अभियंता आय.बी. राठोड, सी.बी. नितनवरे, सहायक अभियंता राजेश हटवार, भांडारकर, कार्यकारी अभियंता एस.एस. चोपडे यांनी पाहणी केली.
४६ गावे सिंचनाखाली ३१ गावे अद्याप वंचित
By admin | Published: October 04, 2016 12:32 AM