समाजकल्याण विभागाच्यावतीने अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. यावर्षी भंडारा जिल्ह्यातून ४१ हजार ३५ विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्यात आले हाेते. त्यात अनुसूचित जातीचे दहा हजार २३५ तर भटक्या विमुक्त जातीचे ३२३९ अर्ज प्राप्त झाले हाेते. समाजकल्याण विभागाने बहुतांश सर्व अर्ज निकाली काढले आहेत.
शासनाच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. महाविद्यालय स्तरावर अर्ज करुन ते समाजकल्याण विभागाकडे पाठविले जाते. अर्जाची छाणणी करुन विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे पाठविले जातात. यंदा काेराेना संकट काळात महाविद्यालय आणि समाजकल्याण विभागाने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुट्या हाेत्या. ऑनलाईन पाेर्टलवरुन विद्यार्थ्यांचा फाेननंबर शाेधून त्यांना सूचना देण्यात आली. ३० जूनपर्यंत त्रुट्याची पुर्तता करावी.
- आशा कवाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, भंडारा
काेराेना संकटात ऑनलाईन पध्दतीने शिक्षण घेण्यात आले. यावर्षी शिष्यवृत्ती मिळणार की नाही अशी शंका हाेती. मात्र ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला. आणि शिष्यवृत्ती मिळाली. काेराेना संकटात पुस्तके व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा माेठा हातभार लागला आहे.
- सुजय रामटेके, भंडारा