निश्चित मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा (चौ.) : शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारताची अर्थसंकल्पना ही शेतीवर आधारित आहे. मात्र दरवर्षी उत्पादनात घट होत असल्यामुळे चित्र उलट निर्माण होत आहे. पालोरा आबादी येथे अनेक वर्षापासून बिज गुणण केंद्र आहे. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टर, यंत्र, मळणी मशीन, शासकीय नोकर व अनेक साहित्य आहे.मात्र या शेतीचा वापर होत नसल्यामुळे येथील यंत्रणा धुळखात आहे. हा बिज गुणण केंद्र रामभरोसे असल्यामुळे येथील अनेक साहित्य चोरीला गेले आहे. येथे कोण मुख्य कर्मचारी आहे. यावर वचक कोणाचे आहे हे एक कोडेच आहे. अनेक साहित्य भंगारात गेले आहेत. येथे खाजगी कर्मचाºयांचा भरणा असल्यामुळे चोर चोर मौसे भाईप्रमाणे कारभार होत आहे. दर पावसाळ्यात थोडे फार जागेचे रोवणी केली जाते. तर काही भागात कठाण घेतल्या जाते. मात्र पिक हातात येतात. शासनाला आमदनी अठन्नी खर्चा रूपया जात असल्यामुळे कृषी विभागाला लक्षवधी रूपयाला चुना लागत आहे.कृषी मंडल कार्यालय रामभरोसेशेतकºयांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा याच आवारात कृषी मंडल कार्यालय आहे. मात्र येथे एकही कर्मचारी येत दिसत नाहीत. हा कार्यालय सुरू आहे किंवा बंद हेच शेतकºयांच्या लक्षात येत नाही. दररोज अनेक शेतकरी आल्यापावली वापस जात असल्यामुळे आता सदस्याला एकही शेतकरी फिरकतानी दिसत नाही. सर्व प्रकार कागदोपत्री दाखविल्या जात आहे, अशी शेतकºयांमध्ये चर्चेला उत आला आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी कधी याकडे भिरकावून सुद्धा पाहत नाही. ही एक खंताची बाब म्हणावी लागेल.
३५ एकरात पिकतो पांढरा पडाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:03 PM
शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विभागाकडून अनेक योजना राबविल्या आहेत. मात्र शासनाकडे कृषी विभागाच्या मालकीच्या पालोरा येथील बीज गुणन केंद्रातील ओलीताखाली असलेल्या जमिनमध्ये पांढरा पडाळ पिकत आहे. याकडे अनेकांना हसू आवरत नाही, अशी दैयनिय अवस्था निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ठळक मुद्देप्रकरण पालोरा येथील : कृषी विभागाचे दुर्लक्ष