लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धूरापासून मुक्ती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा भंडारा जिल्ह्यातील ३५ हजार ३४ महिलांना लाभ मिळाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यावर होणाºया विपरित परिणामाला काही प्रमाणात आळा बसला असून महिलांना धुरापासून जडणाºया विविध आजारातून मुक्तता मिळणार आहे.भंडारा जिल्हयात भारत पेट्रोलियम कापोर्रेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशन व इंडियन आॅईल कापोर्रेशन या तीनही कंपन्याकडे ५५ हजार ९०५ अर्ज प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४३ हजार २३६ अर्ज मंजूर झाले असून ३५ हजार ३४ कुटूंबांना उज्ज्वला योजनेंतर्गत लाभ देण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे.भारत पेट्रोलियम कापोर्रेशनने चार हजार ९५९, हिंदुस्थान पेट्रोलियम कापोर्रेशनने १५ हजार ८८० व इंडियन आॅईल कापोर्रेशनने १४ हजार १९५ असे एकूण ३५ हजार ३४ गॅस कनेक्शन या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना वितरित केले आहे. आजही ग्रामीण व निमशहरी भागातील महिला चुलीवर स्वयंपाक करतात. त्यासाठी इंधन म्हणून लाकुड, कोळसा आणि शेणाच्या गोवºयाचा वापर होतो. यातील मुख्य इंधन म्हणून लाकडाचा उपयोग होतो आणि ते मिळवण्यासाठी महिलांना चांगलेच कष्ट पडतात. चुलीत जळणाºया या अस्वच्छ इंधनातून निघणाºया धुराचा स्त्री आणि तिच्या लहान मुलांच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो.जागतिक आरोग्य संस्थेच्या अहवालानुसार हा धूर श्वसनाद्वारे शरीरात जाणे म्हणजे एका तासात ४०० सिगारेट ओढण्यासारखे आहे. महिला किमान ३ तास सकाळी आणि दोन तास रात्री या अशा धुराच्या सानिध्यात येतात. म्हणजे रोज १६०० सिगारेट आणि वर्षाच्या ५ लाख ८४ हजार सिगारेट ओढणे होय. परिणामी दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांना महिला बळी पडतात. तिच्या संपूर्ण आयुष्यातील किमान १० ते १५ वर्षे तरी यामुळे कमी होतात.मुख्य म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणा?्या या योजनेची अंमलबजावणी खुद्द पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय स्वत: करीत आहे.यासाठी सर्व पेट्रोलियम कंपन्या या योजनेची अंमलबाजावणीसाठी नेमल्या आहेत.केवळ सव्वा वर्षात देशात दोन कोटी ९५ लक्ष ४३ हजार ११३ कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्रात १५ लाख २८ हजार ५४ महिलांना याचा लाभ मिळाला असून भंडारा जिल्ह्यात ३५ हजार ३४ गरीब महिलांचा सन्मान यामुळे वाढला आहे. प्रत्येक जोडणीमागे १६०० रुपये अनुदान देण्यात येत असून या योजनेच्या अंमलबाजावणीसाठी केंद्र शासनाने ८ हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पीत केला आहे.
३५ हजार महिलांना मिळाला ‘उज्ज्वला’ सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:20 PM