शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पालिका हद्दीत ४१६ बालके कुपोषित

By admin | Published: July 01, 2017 12:20 AM

बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

वर्षभरातील आकडेवारी : १५ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाल मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्यासाठी सन २००५ पासून राज्यात राजमाता जिजाऊ माता - बाल आरोग्य व पोषणमिशन कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी लक्षावधींचा खर्च करण्यात आला असला तरी एक वर्षभरात कुपोषणामुळे १५ बालकांचा मृत्यू झाला आहे. भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालीका हद्दीतील ही आकडेवारी आहे. जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर या तीन्ही नगरपालिका क्षेत्रात शंभरपेक्षा जास्त आंगणवाड्या आहेत. मागील वर्षभरात बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी कार्यालयांतर्गत भंडारा व पवनी येथे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाअंती ० ते ६ वयोगटातील जवळपास ८ हजार २६७ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ४१६ बालके कुपोषीत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी १५ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. जून २०१६ ते मे २०१७ या कालावधीत भंडारा, पवनी आणि तुमसर या नागरी क्षेत्रांतर्गत ० ते ६ वयोगटातील ८ हजार २६७ बालकांपैकी ३९३ बालके मध्यम तिव्र स्वरुपात कुपोषीत असल्याचे तर २३ बालके अति कुपोषित श्रेणीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच ६ हजार ६४२ साधारण कुपोषण श्रेणीत असल्याचे दिसून आले. विभागानुसार घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीत ० ते १ या वयोगटातील १५ बालके कुपोषणामुळे दगावली आहे. सर्वेक्षणात ० ते ६ महिने वयोगटातील ७४३ बालके, सहा महिने ते एक वर्ष वयोगटातील ८६५, एक वर्ष ते ३ वर्ष वयोगटातील २ हजार ९३८ तर तीन वर्ष ते पाच वर्ष वयोगटातील २ हजार ७३१ बालके कुपोषीत असल्याचे घोषीत करण्यात आले. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर प्रभावी कार्य सुरु आहे. बालकांचा कुपोषणावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.- सुरेश ठाकरे, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) भंडारा.