आज परीक्षा : एम.एच.टी.सी.ई.टी. प्रवेश परीक्षाभंडारा : राज्य शासनाच्यावतीने आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान व तंत्रशिक्षण (इंजिनिअरींग व फार्मसी) अभ्यासक्रमासाठी जिल्ह्यात ५ मे पासून एम.एच.टी.सी.ई.टी. ही सामाईक प्रवेश परीक्षा होणार आहे. जिल्ह्यात ४,४९८ विद्यार्थी परिक्षेस बसणार आहेत.सर्व उमेदवारांनी सकाळी ९.१५ वाजता परीक्षा केंद्रावर आवश्यक लेखनसामग्री, प्रवेश व छायाचित्र ओळखपत्रासह उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी नियोजित वेळेत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरुन परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहणे शक्य होईल. सकाळच्या सत्रात सकाळी १० वाजेनंतर व दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, याची विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र सकाळी १० ते ११.३० वाजता, जीवशास्त्र दुपारी १२ ते १.३० वाजता, गणित दुपारी ३ ते ४.३० पर्यंत राहील. सदर प्रवेश परिक्षेसाठी भंडारा जिल्ह्यासाठी शासनामार्फत डॉ.भुषण महाजन यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)ही आहेत परीक्षा केंद्रे लाल बहादूर शास्त्री शाळा, नूतन महाराष्ट्र विद्यालय, सेंट पिटर इंग्लीश स्कूल बेला, महर्षी विद्या मंदिर बेला, जेसीस कॉन्व्हेंट भंडारा, आर.एम. पटेल कॉलेज भंडारा , आठवले समाजकार्य विद्यालय, जे.एम.पटेल कॉलेज भंडारा, नानाजी जोशी विद्यालय शहापूर, मनोहरभाई पटेल इंजिनियरींग कॉलेज शहापूर, शरदचंद्र पवार पॉलिटेक्निक कॉलेज भिलेवाडा, मधुकरराव पांडव इंजिनियरींग कॉलेज भिलेवाडा या केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे.
४,४९८ विद्यार्थी परीक्षा देणार
By admin | Published: May 05, 2016 12:51 AM