5वर्षापुर्वी तालुक्यात जवळपास ४३७ पांदण रस्त्यांचे शासनाच्या विविध योजनेतून विविध यंत्रना अंतर्गत बांधकाम करण्यात आले. सदर पांदण रस्त्यांपैकी काही पांदण रस्त्यांचे मुरुमकाम, खडीकरण,डांबरीकरण व सिमेंट कॉन्क्रेटी करण करण्यात आले.मात्र मुरुमकाम करण्यात आलेल्या पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरनासाठी पुढील काळात शासन स्तरावर उपाय योजना न झाल्याने मुरुमकाम झालेले पांदण रस्ते मातिमय झाल्याची बोंब आहे.
रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात यावे अशी प्रमुख मागणी सर्वच स्तरातून करण्यात आल्याने वर्षभरापूर्वी तालुक्यातील 45पांदण रस्त्यांच्या मजबुतिकरनाच्या कामाचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे.मात्र सदर प्रस्तावित पांदण रस्त्यांच्या कामाला शासनाने अद्यापही मंजुरी न दिल्याने शेतकरी जनतेत या रस्त्यांच्या मजबुतिकरन सबंधाने संशय व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर व जनतेसाठी पांदण रस्ते मजबुतीकरण अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न झाल्याने या रस्त्यांचे बांधकाम होणे गरजेचे असल्याचे सर्वदूर बोलले जात आहे.
मजबुतीकरनाचे काम झाल्यास तालुक्यातील हजारो शेतक-यांचा बारमाही शेती हंगामात येण्या जाण्याचा व वाहतुकीचा प्रश्न कायम निकाली लागेल असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.या सबंध परिस्थिती शासन प्रशासन तालुक्यातील प्रस्तावत ४५ पांदण रस्त्यांच्या मजबुतीकरना च्या कामाला मंजुरी देणार व बांधकाम होणार ? असा संशयास्पद प्रश्न जनतेत केला जात आहे.