भंडारा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून संथगतीने का होईना कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी ४६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. तर २० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. सध्या २७० व्यक्ती कोरोना ॲक्टिव्ह आहेत.
मंगळवारी ७७१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी भंडारा तालुक्यात ३१, तुमसर, पवनी, लाखनी, लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी ३ तर मोहाडीत २ आणि साकोलीत एका व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत १ लाख ३४ हजार १८० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १३ हजार ७४६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. तर १३ हजार १४९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या जिल्ह्यात २७० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मंगळवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ३२७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घशात खवखव आदी लक्षणे आढळल्यास त्वरित शासकीय रुग्णालयात संपर्क करुन कोविडची तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करुन फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करावे.