लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.या पोलीस स्टेशनला एक पोलीस निरीक्षक, ५ साहाय्यक, उपनिरीक्षक व ७८ पोलीस असा एकून ८४ पोलीसांचे मनुष्यबळ शासन दरबारी आहे. येथील लोकसंख्या पाहता कमीत कमी २५० ते ३०० पोलिसांची गरज आहे. परंतु या ठिकाणी सध्या ४००० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. तालुक्यात दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़.वाढत्या शहरीकरणा बरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणा?्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़. १ लाख ३६ हजार लोकसंख्या असलेल्या या ४८ गावात पोलिसांची संख्या मात्र ३३ इतकीच आहे़ त्यामुळे याठिकाणी घडणा?्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे.त्याचाच परिणाम म्हणून घरफोडी, विनयभंग व अवैद्य धंद्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.सध्या ४०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. पोलीस स्थानकात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी कमीतकमी २५० ते ३०० पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे.पोलिसांची संख्या ३०० वर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.सद्यास्थितीत लाखांदुर तालुक्यात अवैद्य दारू विक्री, सट्टा, जुगार, आँनलाईन सट्टा, घरफोडी, दारू पुरवठा यासह विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. यावर नियत्रंण ठेण्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.
लाखांदुरातील ४८ गावांची धुरा ३३ पोलिसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 9:54 PM
लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : येथील पोलीस स्टेशन अंतर्गत ४८ गावे येत असून, सुमारे १ लाख ३६ हजार लोकसंख्या आहे. त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ८४ पोलिस मनुष्यबळ आहे. मात्र सध्या लाखांदुर पोलीसठाण्यामध्ये ३३ पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास ...
ठळक मुद्देकामाचा ताण : लाखांदूर ठाण्यात कर्मचाऱ्यांचा अभाव