शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

रोहयोची ५०० कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:35 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.

ठळक मुद्देपाच वर्षे : २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन, भंडारा जिल्हा रोहयोत प्रगतीपथावर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने मजुरांचे स्थलांतरण थांबवून विकास योजनांनाही गती आली आहे.शासनाच्या महत्वकांक्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना हमी योजनेला भंडारा जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ५६७ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली असून या नोंदणीकृत कुटुंबांना रोजगार पत्रकाचे वाटप करण्यात आले. ग्रामीण क्षेत्राचा विकास होण्याच्या दृष्टीने ही योजना उपयुक्त असून या योजनेची किमान ५० टक्के अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले. विकासाचे विकेंद्रीकरण आणि रोजगाराची निर्मिती होत आहे.भंडारा जिल्ह्यात २०१४ मध्ये १ लाख १५ हजार २५२ कुटुंबातील २ लाख ३५ हजार ६३५ मजुरांना मागणीनुसार स्थानिक क्षेत्रात काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ९९ कोटी २५ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आला. ५२ लाख ४९ हजार मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. २०१५-१६ मध्ये १ लाख १६ हजार ६३४ कुटुंबातील २ लाख ४८ हजार ८८२ मजुरांना काम देण्यात आले. त्यावर १०२ कोटी २७ लाख २००० रुपये खर्च झाला. ५९ लाख ७६ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट गाठण्यात आले.२०१६-१७ मध्ये १ लाख २२ हजार १३७ कुटुंबातील २ लाख ६५ हजार १६९ मजुरांना स्थानिक काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ११४ कोटी ६७ लाख ९ हजार खर्च झाला. यावर्षी ५५ लाख १४ हजार मनुष्यदिन काम निर्मिती करण्यात आली. २०१७-१८ मध्ये १ लाख २६ हजार ४४ कुटुंबातील २ लाख ७३ हजार ९८५ मजुरांना मागणीनुसार काम उपलब्ध करून देण्यात आले.त्यावर ११९ कोटी १३ लाख ३१ हजार रुपये खर्च झाले. ५३ लाख १३ हजार मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली.१०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे वाटचालभंडारा जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये डिसेंबर अखेर १ लाख ३१ हजार १२० कुटुंबातील २ लाख ८३ हजार ३३८ मजुरांना काम उपलब्ध करून देण्यात आले. त्यावर ७९ कोटी ४८ लाख १३ हजार रुपये खर्च झाले. यावर्षात जिल्ह्याला ५९ कोटी ३५ हजार मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुसार डिसेंबर अखेरपर्यंत ४३ लाख ९ हजार काम पूर्णत्वास गेले आहे. मार्च अखेरपर्यंत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने विकासासोबतच स्थानिक पातळीवर मजुरांना काम उपलब्ध झाले आहे.