भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. रविवारी जिल्ह्यात ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर ५१६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. चौघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ५३ हजार २६१ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
रविवारी २०३२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ४०, मोहाडी २, तुमसर ९, पवनी १२, लाखनी ५, साकोली २५ आणि लाखांदूर तालुक्यात ३ अशा ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात तुमसर, साकोली तालुक्यातील प्रत्येकी १, तर लाखनी तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ६६ हजार ९०१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५७ हजार २७२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर ५३ हजार २६१ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. मृतांची संख्या १०२० झाली आहे. सध्या जिल्ह्यात २९९१ व्यक्ती उपचाराखाली आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. सध्या भंडारा तालुक्यात ८०३, मोहाडी ११७, तुमसर २८६, पवनी २१३, लाखनी ४२५, साकोली ९८४, लाखांदूर १३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
बाॅक्स
भंडारा तालुक्यात आज एकही मृत्यू नाही
जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात झाली आहे. दररोज मृत्यूची नोंद तालुक्यात होत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, रविवार दिलासा देणारा ठरला. तालुक्यात रविवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०२० व्यक्तिंचा कोरोनाने बळी घेतला. त्यात भंडारा ४७९, मोहाडी ९२, तुमसर १११, पवनी १००, लाखनी ९०, साकोली १००, लाखांदूर ४८ व्यक्तिंचा समावेश आहे.
बाॅक्स
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के
एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. मात्र, मे महिन्यात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. रविवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के नोंदविण्यात आले.