६४ कोटींच्या निधीतून १७१७ कामे : वनविभागाचे ५७८, कृषी विभागाचे ४८९, पंचायत विभागाच्या ४२८ कामांचा समावेशभंडारा : दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात सन २०१७-१८ मध्ये भंडारा जिल्ह्यात सातही तालुके मिळून ५६ गावात १७१७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी ६३ कोटी ६६ लाख रूपयांचा निधी खर्च होणार आहे. यात सर्वाधिक ५७८ कामे वन विभागाची, कृषीची ४८९ कामे, तर ग्रामपंचायत विभागाची ४२८ कामे प्रस्तावित आहेत. या सर्व कामांचे नियोजन संबंधित यंत्रणांनी केले आहे.जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ मध्ये भंडारा तालुक्यातील मांडवी, सितेपार, कवडसी, चांदोली, खापा, गांगलेवाडा, राजेगाव, मालीपार व डोंगरगाव. तुमसर तालुक्यातील लोहारा, सोनपूरी, चुल्हाड, चांदपूर, भोंडकी, सोरना, लंजेरा, परसवाडा, आग्री व चुल्हारडोह. मोहाडी तालुक्यातील नवेगाव बु., जांभळापाणी, दवडीपार, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव व देऊळगाव. पवनी तालुक्यातील सिरसाळा, बेटाळा, शेळी सो, खातखेडा, भावड, मेंढेगाव, कन्हाळगाव व निष्टी. लाखांदूर तालुक्यातील मुशी, मासळ, कोच्छी, घोडेझरी व मानेगाव. साकोली तालुक्यातील सिरेगाव (टोला), झाडगाव, गिरोला, किटाळी, खांबा, बाम्पेवाडा व गुढरी आणि लाखनी तालुक्यातील कन्हेरी, इसापूर, पेंढरी, डोंगरगाव- न्या, मचारणा, कोलारी, चिखलाबोडी व जेवनाळा अशा एकूण ५६ गावांचा समावेश आहे.या गावात विविध यंत्रणांकडून १७१७ कामे प्रस्तावित आहेत. यात कृषी विभाग ४८९, ग्रामपंचायत विभाग ४२८, वन विभाग ५७८, लघुसिंचन विभाग जिल्हा परिषद १३८, लघुसिंचन जलसंधारण ६, पाटबंधारे विभाग ८, भूजल सर्वेक्षण ५५, सामाजिक वनीकरण २ , ग्रामीण पाणीपुरवठा ३ व इतर २५ कामांचा समावेश आहे. विविध यंत्रणा मिळून भंडारा तालुक्यात २९६, मोहाडी ३५६, तुमसर २४१, पवनी १८०, साकोली २६७, लाखनी २२८ व लाखांदूर १४९ कामे करण्यात येणार आहे. या कामांवर एकूण ६३ कोटी ६६ लाख निधी आवश्यक आहे.२०१५-१६ मध्ये भंडारा जिल्ह्यात ८६ गावांची निवड करण्यात आली होती. या गावात १,११९ कामे पूर्ण करण्यात आली असून जलयुक्त शिवार अभियानाचा लाभ या भागातील मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी घेतला आहे. एक किंवा दोन पाण्याने जाणाऱ्या धानाला जलयुक्त शिवार अभियानामुळे संजीवनी मिळाली आहे.सन २०१६-१७ मध्ये एकूण ५९ गावांची निवड करण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियानामध्ये भंडारा तालुक्यातील चोवा, रावनवाडी, खुटसावरी, गुंथारा, सालेहेटी, टेकेपार (डोह), कोका, सर्पेवाडा, दुधाळा. मोहाडी तालुक्यात महालगाव, डोंगरगांव, हिवरा, चिंचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगांव(धु), धोप, ताडगांव, जांब. तुमसर तालुक्यात हिंगना, मिटवाणी, झारली, येदबुची, राजापूर, लोभी, सोदेपूर, सोनेगाव, देव्हाडी, सुकळी(दे.). पवनी तालुक्यात तांबेखानी ( रिठी ), रेंगेपार (रिठी), ब्रम्ही, निलज, भुयार, आमगांव, कातुर्ली, धानोरी, शेलारी (रिठी). लाखनी तालुक्यात निमगांव, मांगली, देवरी, रेंगोळा, किटाळी, मुरमाडी (हमेशा), मुरमाडी(तुप.), पहाडी, घोडेझरी. साकोली पळसपाणी, सावरगांव (रिठी), सालई खूर्द (रिठी), सराटी, आमगांव(बुज), विर्सी आणि लाखांदूर तालुक्यात झरी, पारडी, तिरखुरी, दिघोरी, पेंढरी(सोनेगाव) अशा एकूण ५९ गावांत कामे प्रगती पथावर आहेत.या गावात विविध यंत्रणांमार्फत २३८९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहेत. यासाठी ६१ कोटी ३० लाखांचा निधी खर्च होणार आहे. यात कृषी विभाग ७६७, वन विभाग २५४, मग्रारोहयो जि.प. १११४ कामे करणार आहेत. या कामातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
५६ गावातील ‘शिवार’ होणार जलयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 12:44 AM