शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सहा वर्षात ५७९ क्षयरुग्णांचा मृत्यू

By admin | Published: March 29, 2016 12:26 AM

क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो.

८,७९८ रुग्णांचा शोध : ६,१९५ रुग्ण औषधोपचारानंतर बरेभंडारा : क्षयरोग हा शब्द किती मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा आजार म्हणून ओळखल्या जातो. वैद्यकीय क्षेत्राने यात भरीव कामगिरी करून औषधोपचाराने त्यावर नियंत्रण मिळविले आहे, असे असले तरी मागील सहा वर्षात जिल्ह्यात ८,७९८ क्षयरुग्ण आढळून आले. त्यातील ५७९ रुग्णांना जीव गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. वरील आकडेवारीवरून जिल्ह्यात क्षयरोगाची मोठ्या प्रमाणात लागण असल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी शासकीय रुग्णालयातील असून खासगी रुग्णालयात उपचार घेणारे व समाजात वावरत असताना भीतीपोटी उपचार न घेणाऱ्यांचा यात समावेश नाही. या दोन्ही बाबींचा यात समावेश झाल्यास आकडेवारी आणखी फुगू शकते. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद अक्षया प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिन गुरूवारला साजरा करण्यात आला. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अ‍ॅडव्होकेसी कॉम्युनिकेशन अ‍ॅड सोशल मोबिलायझेशन (एसीएसएम) प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये संवाद प्रणाली जनजागृतीच्या कार्यक्षेत्रातील समस्या, अडथळे शोधून गरजेनुसार पर्याय उपलब्ध करून देण्यात येते. क्षयरोग हा शब्द मोठा व लवकर नियंत्रणात न येणारा असला तरी वैद्यकीय क्षेत्राने भरीव प्रगती केल्याने भयान वाटणारा क्षयरोगही आता नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. सन २००९ ते डिसेंबर २०१५ पर्यंत जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नोंद झालेल्या क्षयरुग्णांच्या आकडेवारीवरून रुग्णांचे माहिती उपलब्ध झाली. यात या सहा वर्षात ८,७९८ क्षयरुग्ण शोधण्यात आले. यापैकी ६,१९५ रुग्ण औषधोपचाराअंती बरे झाले. यातील ५७९ रुग्णांचा मृत्यू झाला. २००९ व २०१३ मध्ये १०० च्यावर क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. (शहर प्रतिनिधी) एमडीआर व एक्सडीआर रुग्णजिल्ह्यात एमडीआर व एक्सडीआर या क्षयरोग आजाराचे रुग्ण आढळून आले आहे. सन २००७ पासून तर डिसेंबर २०१५ अखेर एमबीआर १०६ रुग्णांचे निदान करण्यात आले. त्यापैकी २५ रुग्ण बरे झाले व आठ रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. यातील २१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत २१ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. एक्सडीआर क्षयरुग्ण संख्या सात असल्याचे निदान झाले आहे. तीन रुग्णांवर औषधोपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. क्षयरोगाचे जंतू रुग्णांच्या खोकल्यातून हवेवाटे वातावरणात पसरतात. एका क्षयरुग्णापासून वर्षभरात १० ते १५ क्षयरुग्ण तयार होतात. वेळीच डॉट्स रूपी औषध घेणे गरजेचे आहे. - वाय.बी. कांबळेजिल्हा क्षयरोग अधिकारी,भंडारा