मोहाडी - शालेय विद्यार्थ्यांमधील नवविचारांच्या संकल्पनेचे प्रदर्शन व्हावे याकरिता इंस्पायर अवार्डच्या उत्सवात जिल्ह्यातील ५५७ ळांमधून १४४७ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी भंडारा जिल्ह्यातील केवळ ६१ शाळांना इंस्पायर अवार्डच्या उत्सवात भाग घ्यायला मिळणार आहे.
सृजनशील व रचनात्मक विचार रुजविण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून इंस्पायर अवार्डची योजना २००९ पासून सुरु करण्यात आली आहे. इंस्पायर अवार्डची योजनेत इयत्ता सहावी ते दहावीतील गुणवंत विध्यार्थी सहभागी होणार आहेत. भंडारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून इंस्पायर अवार्ड योजनेचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाखांदूर या तालुक्यातील ६३,लाखनी तालुक्यातील ६७ व पवनी तालुक्यातील ८१ शाळांपैकी शंभर टक्के शाळा इंस्पायर अवार्ड योजनेच्या सहभागासाठी नोंदणी केली होती. तसेच भंडारा तालुक्यातील १०६ शाळा, मोहाडी ६१ शाळा, साकोली ५७ शाळा, तुमसर तालुक्यातील १२१ शाळा सहभागा साठी नोंदणी होती. त्यापैकी भंडारा तालुक्यातील १७ विद्यार्थी, साकोलीतील १५ विद्यार्थी, तुमसर तालुक्यातील १२ विद्यार्थी, लाखनी मधील ६ विद्यार्थी, लाखांदूर तालुक्यातील ५ विद्यार्थी, पवनी तालुक्यातील ४ तर सर्वात कमी मोहाडी तालुक्यातील केवळ २ विद्यार्थी इंस्पायर अवार्डच्या योजनेत भाग घेण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मंजुरी दिली आहे. महराष्ट्रातील तीन हजार १३९ विद्यार्थी या योजनेत सहभागी होणार आहेत.
प्रेरणा पुरस्कार योजनेत भंडारा जिल्हा विद्यार्थ्यांचे नामांकन करण्यास उदासीन होता. राज्यस्तरावर जिल्हा खूप पिछाडीवर होता. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लिकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांना प्रेरित केले. तसेच वेळोवेळी ऑनलाईन संवाद साधला त्याचा परिणाम सकारात्मक दिसून आला. त्यामुळे जिल्ह्यातील ६१४ शाळांपैकी ५५६ शाळेतून १४४७ विद्यार्थी इंस्पायर अवार्डच्या प्रदर्शनात सामील होण्यासाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील शाळांच्या सहभागी नोंदणीची टक्केवारी९१.०४ होती. विचारांची निवड व नवीनता, व्यावहारिकता, सामजिक उपयोगीता, पर्यावरणाची अनुकूलता, अस्तित्वात असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा अधिक योग्य असण्याच्या मानकावर
विविध तंत्रज्ञानाची मॉडल
निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयाची राशि दिली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याना विभागीय पातळीवर सहभागी होता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला भरारी देता यावी म्हणून शिक्षणाधिकारी(माध्य) संजय डोर्लिकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रेरित
केले होते. त्यामुळे इंस्पायर अवार्ड योजनेत शाळांची नोंदणीत जिल्ह्याचे उत्कृष्ट कार्य झाले आहे.
*बॉक्स*
• इंस्पायर अवार्डसाठी
राज्यस्तरावर झालेल्या विद्यार्थ्यांच्या नामांकनात भंडारा आठव्या स्थानावर आहे होता. मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षकांनी इंस्पायर अवार्ड नोंदणी करण्यास सक्रीयता दाखविली.
बालकांच्या संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे* अधिक सोपे होणार आहे. विद्यार्थ्यांनी जनतेला व शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी.
संजय डोर्लिकर
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद, भंडारा