शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

धान खरेदीच्या ६६ केंद्राना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 9:31 PM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : आधारभूत धान खरेदीच्या जिल्ह्यात ६६ केंद्राना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. अपवाद वगळता प्रत्यक्ष धान ...

ठळक मुद्देप्रत्यक्ष खरेदीची प्रतीक्षा : साधारण धानाला प्रति क्विंटल १७५० हमी भाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत धान खरेदीच्या जिल्ह्यात ६६ केंद्राना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. अपवाद वगळता प्रत्यक्ष धान खरेदीला अद्यापही प्रारंभ झाला नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी व्यापाऱ्यांकडे धान विकण्याची वेळ आली आहे. यंदा शासनाने अप्रतिच्या धानासाठी १७७० तर साधारण प्रतिच्या धानासाठी १७५० रुपये आधारभूत किंमती निश्चित केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्र सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.दुष्काळाशी दोन हात करीत शेतकऱ्यांच्या धान आता घरी येवू लागला आहे. सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे. त्यामुळे शेतकरी धान विकण्याच्या तयारीत आहे. मात्र काही अपवाद वगळता जिल्ह्यात सरसकट धान खरेदी केद्र सुरु झाले नाही. त्यामुळे आपला धान विकावा कुठे असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकºयांपुढे पडला आहे.अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश दिले. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०१९ पर्यंत धान खरेदीचा कालावधी निश्चित करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ६६ धान खरेदी केंद्राना मंजुरी दिली आहे. त्यावरुन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी विविध सहकारी संस्थाना सात दिवसाच्या आत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र दसऱ्यापुर्वी काही अपवाद वगळता प्रत्यक्ष धान खरेदीला सुरुवात झाली नव्हती. दसऱ्यानंतर धान खरेदी वेगात सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने धान खरेदीची जय्यत तयारी चालविली आहे.यंदा शासनाने अप्रतिच्या धानासाठी १७७० रुपये तर साधारण प्रतिच्या धानासाठी १७५० रुपये दर निश्चित केले आहे. शेतकऱ्यांना या केंद्रावर धान विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. केंद्राना जोडलेल्या गावांना आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोकन घेतेवेळी माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला धान प्रत्यक्ष नंबरप्रमाणे विक्रीस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे.ही आहेत धान खरेदी केंद्रवाकेश्वर, आमगाव, बेलगाव, डोंगरगाव, कांद्री, उसर्रा, करडी, ताडगाव, मोहाडी, पालोरा, मोहगाव देवी, काटेब्राम्हणी, चुल्हाड, सिहोरा, देवसर्रा, हरदोली, वाहनी, बघेडा, आष्टी, चिंचोली, नाकाडोंगरी, बपेरा, मिटेवानी, तुमसर, माडगी, डोंगरी बुज., पिंपळगाव, पोहरा, पालांदूर, मुरमाडी तुप., लाखनी, जेवनाळा, सालेभाटा, सातलवाडा, परसोडी, एकोडी, लाखोरी, जेवनाळा, मेगापुर, देवरी, साकोली, विर्शी, सानगडी, निलज गोंदी, सुकळी, वडद, सावरबंध, पळसगाव, गोंडउमरी, लाखांदूर, बारव्हा, पुयार, मासळ, विरलीबुज. दिघोरी, पारडी, डोकेसरांडी, सरांडी बुज., हरदोली, भागडी, कऱ्हाडला, पवनी, अड्याळ (चकारा), आमगाव (पवनी), आसगाव, चिचाळ या केंद्राचा समावेश आहे.