शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

जिल्ह्यातील ६७९ गावे पाणीटंचाईच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:37 AM

तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्दे१५५५ उपाययोजना : १२ कोटी ५८ लाखांचा कृती आराखडा, गावागावांत पाण्यासाठी भटकंती सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कृती आराखड्यातील उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही तर मे महिन्यात पाण्यासाठी हाहाकार उडण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पाणी टंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. तलाव, बोडीतील जलस्तर घटल्याने पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. भूगर्भातील जलपातळी तापत्या उन्हाने खालावत असल्याने विहिरींनी तळ गाठला असून हातपंपही कोरडे पडत चालले आहे. जिल्ह्यातील नदीचे पात्र वाळवंट झाले असून चुलबंदसह विविध नद्या कोरड्या पडल्या आहेत. नदीतीरावरील गावासोबतच जिल्ह्यातील तब्बल ६७९ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. १ जानेवारी ते ३० जून पर्यंत १५५५ उपाययोजना या कृती आराखड्यात सूचविण्यात आल्या आहेत. त्यात ४३१ गावात ५४१ नवीन विंधन विहिरी घेणे, ११२ गावात ११७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १२१ गावात ४४६ विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती तर २७५ गावात विहिरी खोलीकरण व गाळ काढण्याचा समावेश आहे.यावर १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत ५२ गावातील ६२ नवीन विंधन विहिरींसाठी ७२ लाख ११ हजार रुपये खर्च करण्यात आले आहे. तर विंधन विहिर विशेष दुरुस्तीसाठी १९० गावांमध्ये ३८ लाख ३५ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. १ कोटी १० लाख ४६ हजार रुपये एप्रिल महिन्यात पाणी टंचाईच्या कामांवर खर्च झाल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. मात्र नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि विहिरीतील गाळ काढण्याची उपाययोजना मात्र शून्य आहे.जलस्तर एक मीटर खालीजिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असून सरासरी एक मीटर खाली पाणी पातळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे गावातील विहिरींची पातळी खालावली असून हातपंपही कोरडे पडत आहे. प्रभावी उपाययोजना होत नसल्याने दरवर्षी जलस्तर खालीखाली जात आहे. 

टॅग्स :Waterपाणी