शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

७० गावांना मिळणार २६ कोटींची नुकसानभरपाई

By admin | Published: July 05, 2017 12:57 AM

शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही.

२०१५ च्या खरीप हंगामातील नुकसान : विभागीय आयुक्तांनी मागितला अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतकऱ्यांचा दृष्टचक्र कमी होत नाही. दुष्काळाचे संकट येवून पडते. शेतकरी मोडला जातो. दुष्काळ जाहीर होवूनही मदत वेळेवर मिळत नाही. दोन वर्षानंतर प्रशासन आता जागे झाले असून खरीप २०१५ ची नुकसान भरपाई मिळण्याचे संकेत मिळाले आहे. किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागेल याची माहिती नागपूर विभागीय आयुक्तांनी मागितली आहे. तहसील कार्यालयाकडून माहिती गेली असून दोन वर्षानंतर नुकसानभरपाई मिळण्याची आशा बळावली आहे. २०१५ च्या खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आली होती. ती गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. यात भंडारा तालुक्यातील चार गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, तुमसर १२ गावे, मोहाडी ७० गावे, साकोली ९४ गावे, लाखांदूर ८९ गावे, लाखनी १०२ अशी ३७१ गावे दुष्काळग्रस्त जाहीर केली होती. मोहाडी तालुक्यातील सिंचनाखाली पिकांच्या क्षेत्राखाली येणारे २२,६७९ शेतकरी तसेच कोरडवाहू पिकाखाली क्षेत्राखाली येणारे ११९२ शेतकरी अशा २३ हजार ८५१ शेतकऱ्यांना २५ कोटी ९६ लक्ष ६७ हजार रुपये दिले जाणार आहे. तहसीलदार यांनी नुकसान भरपाईकरिता तेवढ्या आवश्यक निधीची मागणी रक्कम जिल्हाधिकारी भंडारा यांना कळविली आहे. खरीप हंगाम २०१५ मध्ये ५० पैसेपेक्षा कमी असलेल्या गावामध्ये हिवरा, नवेगाव, रिठी, बच्छेरा, पांजराग्राम, कांद्री, बोथली रिठी, देऊळगाव, बिटेखारी, जांब, धुसाळा, बोंदरी, घोरपड, नवेगाव, खैरलांजी, काटी, धोप, ताडगाव, सिहरी, सकरला, मलदा, आंधळगाव, चिचोली, अकोला, सालई खुर्द, नेरला, रिठी, पालडोंगरी, उसर्रा, डाकला, काटेबाम्हणी, सालई बु., विहिरगाव, यंदा, भिकारखेडा, धर्मापूरी, डोंगरगाव, महालगाव, घाटकुरोडा, पांजरा, बोथली, माहेगाव, रोहणा, दहेगाव, देव्हाडा, नरसिंगटोला, देव्हाडा खु., निलज बु., जांभळापाणी, मोहगाव, उसरीपार, दवडीपार, ठाणेगाव, निलज खुर्द, मुंढरी, खु., मुंढरी, बु., कान्हळगाव, ढिवरवाडा, करडी, एकलाझरी, जांभोरा, किसनपूर, बोरी, पांजरा, पांजरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे, पालोरा, केसलवाडा, लेंडेझरी, बोरगाव या गावांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार असताना दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर करण्यात आली होती.२०१५ चा खरीप हंगाम संपून दोन वर्ष संपली आहेत. २०१७ च्या खरीप हंगामाची लगबग सुरु झाली. सुलभ पीक कर्ज घेण्यासाठी शासनाने शिबिर लावली. पण, शेतकऱ्यांनी एप्रिल, मे मध्ये शेती पीक कर्जाची उचल केल्यानंतर, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्यानंतर सुलभ पीककर्ज वाटप करण्याचे नाटके सुरु केल्या आहेत.