शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

खरीप हंगामासाठी ७० हजार २१० मेट्रिक टन खत साठा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:34 AM

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा ...

भंडारा : आगामी खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी विभागाने कंबर कसली असून, खरिपासाठी जिल्ह्याला ७० हजार २१० मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे.

जिल्ह्यात एक लाख ८२ हजार ८३ हेक्टर क्षेत्र सर्वसाधारण असून, एक लाख ९५ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र हे धान पिकाचे राहणार असून, २ लाख १३ हजार ८३७ हेक्टरवर धान, तर तूर पीक ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्‍टरवर पेरणी होणार आहे. गतवर्षी खरीप हंगामात महापूर, तुडतुडा रोगाने, अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना चांगलाच फटका बसला होता. हे नुकसान भरून काढण्यासाठी कृषी विभागाकडून यावर्षी खरीप हंगामासाठी नव्या जोमाने नियोजन केले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठेही खताची टंचाई भासू नये, यासाठी २०२१च्या खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे १ लाख १७ हजार ७०९ मेट्रिक टन खताची मागणी केली होती. त्यात गतवर्षीचा २३ हजार ८१३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक आहे. तर यावर्षी नव्याने मंजूर झालेला ७० हजार २१० मेट्रिक टन म्हणजेच एकूण ९४ हजार २३ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्ह्यात कुठेही खतांची टंचाई भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले. यासोबतच कृषी केंद्र धारकांनी खताची विक्री पॉस मशीनवर ऑनलाइन पद्धतीनेच करण्याच्या सूचनाही कृषी विभागाने दिल्या आहेत.

यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरिया, डीएपी, एसओपी, एनपीके खते मुबलक उपलब्ध झाली आहेत.

जिल्ह्यात खरिपाच्या मशागत कामांना वेग आला असून, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन आढावा सभा तसेच खरिपातील विविध पिकांच्या नियोजनाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे एकही शेतकरी बियाणे अथवा खतापासून वंचित राहणार नाही, यासाठी आढावा घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी अधीक्षक यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आढावा बैठकीदरम्यान दिल्या आहेत.

बॉक्स

कृषी केंद्रांना ऑनलाइन खते विक्री अनिवार्य

जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन खतांच्या प्रिंटेड एमआरपीनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताची विक्री करावी. याकरिता पॉस मशीनच्या माध्यमातूनच विक्रेत्यांनी खताची विक्री करण्याच्या सूचना कृषी विभागाने कृषी केंद्रांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पॉस मशीन उपलब्ध करण्यात आले असून, ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे खते बियाणे देतानाच शेतकऱ्यांना याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी केंद्रांना सांगण्यात आले आहे.

बॉक्स

शेतकरी सन्मान कक्षातून होणार तक्रारींचे निवारण

शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी तसेच तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यासोबतच खते, बियाण्यांबाबतची कोणतीही तक्रार तालुकास्तरीय कृषी विभागाच्या कार्यालयात, पंचायत समिती कृषी विभाग अथवा जिल्हा स्तरावरील कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची तक्रार प्राप्त होताच त्यानुसार वरिष्ठांकडून चौकशी करीत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

कोट

येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७० हजार २१९ मेट्रिक टन मंजूर झाला आहे. याशिवाय २०२० - २१चा खतसाठा शिल्लक असल्याने जिल्ह्यात कुठेही खताची टंचाई भासणार नाही. यासोबतच खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कृषी कर्मचाऱ्यांना मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

हिंदुराव चव्हाण,

जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा