ठाणे येथे दिवसाढवळ्या चोरी : शोध पथक रवाना
जवाहरनगर : ज्वेलर्स दुकान उघडण्यापूर्वी हातात असलेली सोन्या-चांदीची बॅग बाजूला ठेवली याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी ७५ लक्ष रुपये किमतीची सोन्या-चांदीची भरलेली बॅग पळवून नेली. ही घटना ठाणे टी पॉइंट येथील स्वाती ज्वेलर्स येथे घडली. या प्रकरणी दुकान मालक विनोद भुजाडे यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव व इतर सुरक्षा विभागाचे अधिकारी यांनी भेट दिली. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ठाणे पेट्रोलपंप महात्मा फुले वॉर्ड निवासी विनोद भुजाडे नियमितपणे आपल्या राहत्या घरून, शंभर मीटर अंतरावर ठाणा टी.पॉइंट राष्ट्रीय महामार्गालगत जवाहरनगरकडे जाणाऱ्या बस निवाऱ्यामागील दुकानात दुचाकीने आज सोमवार सकाळी १० वाजता सुमारास निघाले. स्कुटी दुकानाजवळ ठेवली. सोन्या व चांदीच्या दोन्ही बॅग शटरलगत ठेवल्या. शेजारील दुकानदाराकडे बोलण्यासाठी गेले. या दरम्यान त्या बॅगकडे विनोद भुजाडे यांची पाठ असल्याने अज्ञात चोरट्यांनी आपला डाव साधला. मोठ्या बॅगेवरील सोन्याचे साहित्य असलेली लहान बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. दबा धरून दुकानासमोर एका दुचाकीचालकासोबत तो चोरटा बॅग घेऊन घटनास्थळावरून पोबारा झाला.
हे दृश्य समोरील पोहा विक्रेत्याच्या लक्षात येताच जोराचा आरडाओरड केला. विनोद तुझी बॅग चोरट्यांनी पळविली. हे लक्षात येताच लगेच टी पॉइंटवर उभे असलेले कोब्रा बटालियन येथील जवान गोलू जेधे व स्थानिक पान टपरीचालक सादिक शेख सोबत दुचाकीने १२० प्रति वेगाने पाठलाग केला. मात्र चोरांचा थांगपत्ता लागला नाही. माथनी टोलनाक्यापर्यंत त्यांचा पाठलाग करण्यात आला. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागला नाही. जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक वसंत जाधव व इतर सुरक्षा विभागाचे अधिकारी डीवायएसपी यांनी भेट दिली. शोधकार्य वेगाने फिरवीत तीन दिशेने तत्काळ शोध पथक रवाना करण्यात आले.