पोलिसांची कारवाई : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिवस पाळण्यात आला. शासकीय पंचासमक्ष ८६९४० किलोग्रॅम गांजा किंमत ८,६९,९४० रुपयांचे साहित्य जाळून नष्ट करण्यात आले.अमली पदार्थांचे दुष्परिणामाबाबत लोकांना जनजागृती व्हावी याकरिता अंमली पदार्थ विरोधी शाखा भंडाराचे मार्फतीने भंडारा शहरात बसस्थानक, सामान्य रुग्णालय, सिनेमागृह, शाळा, कॉलेज, गर्दीचे चौकात बॅनर लावून सेवनाचे दुष्परिणामाबाबत जागृती करण्यात आली. गर्दीचे ठिकाणी या अंमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे आजाराबाबत माहिती देण्यात आली. गर्दीचे ठिकाणी या अंमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे आजाराबाबत माहिती देण्यात आली. पॉम्प्लेट देवून जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक ठाणे प्रभारी यांनी पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थांचे सेवनामुळे होणारे दुष्परिणामांचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात अंमली पदार्थाचे गुन्ह्यात जप्त असलेला मुद्देमाल न्यायालय व वरिष्ठांच्या आदेशाने पंचासमक्ष ८६९४० किलोग्रॅम गांजा जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी पोलीस मुख्यालय परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू, अध्यक्षतेखाली व समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, एम. एम. सिडाम, सुरेश घुसर, पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे आदी उपस्थित होते. २६ जून हा जगभर अमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो. फक्त एकच दिवस विरोधी दिवस पाळून भागणार नाही तर अमंली पदार्थ बाळगणारे, विकणारे, सेवन करणारे लोकांवर नजर ठेवून त्यांना या व्यसनापासून परावृत्त करावे, तसेच अशा लोकांची माहिती पोलीसांना द्यावी. जेणेकरुन सदर लोकांवर वेळीच कार्यवाही करुन आळा घालता येईल. अंमली पदार्थ मुक्त समाजाची निर्मितीसाठी मदत होईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.
८ लक्ष ७० हजारांचा गांजा जाळून केला नष्ट
By admin | Published: June 30, 2017 12:37 AM