भंडारा : संभाव्य तिसरी लाट दारावर असताना जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार १४८ व्यक्तींनी मुदत संपूनही कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. कोरोना लाटेच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम अनुभवल्यानंतरही नागरिक बेफिकिरीने वागताना दिसत आहे. जिल्ह्यात सहा लाख सात हजार ४२५ व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाख ७७ हजार ८८ आहे. पहिला डोस घेणाऱ्यांपैकी ८४ हजार १४८ व्यक्ती दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असतानाही लस घेतली नाही.
बॉक्स
दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
कोरोनापासून बचावासाठी लसीचा पहिला डोस घेतला म्हणजे सुरक्षित झाले असे नाही. लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. केवळ पहिला डोस घेऊन लसीकरणाकडे पाठ न करता लसीचा दुसरा डोस घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. दोन्ही डोस बचाव करू शकतात.
बॉक्स
नेमकी अडचण काय
कोरोनाची पहिली लस उत्साहाने आणि रांगेत लागून घेतली. मात्र, दुसरी डोस घेण्यासाठी अनेकजण बेफिकीर दिसत आहेत. मुलांची परीक्षा, शेतीची कामे, सण-उत्सव अशी कारणे पुढे केली जात आहे. डोस घेण्यास कोणतीही अडचण दिसत नाही. केवळ कंटाळा आणि बेफिकिरीच कारणीभूत आहे.
कोट
पहिला डोस घेतल्यानंतर मुदतीत दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. काही लोक मुदतीमध्ये दुसरा डोस घेत नाहीत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ही बाब धोकादायक आहे.
- डॉ. प्रशांत उईके,
जिल्हा आरोग्य अधिकारी.