लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ८६१ आरोग्य पथक घरोघरी जाऊन आरोग्य जागृती करणार आहेत. जिल्ह्यातील लोकसंख्या १२ लाख १८ हजार २११ असून २ लाख ८५ हजार ४१४ कुटुंबांना भेटी देऊन ही पथक वैयक्तिक, कौटुबिक व सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबतची ही त्रिसुत्री आवश्यक असल्याचे महत्व नागरिकांना या मोहिमेत पटवून देणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पत्रपरिषदेत दिली.‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ कोविडमुक्त महाराष्ट्र मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर व डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते. पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर २२ दिवस व दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोंबर १२ दिवस अशा दोन टप्यात ही मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.मोहिम राबविण्यासाठी ग्रामीण भागासाठी ७९० तर शहरी भागासाठी ७१ पथके तयार करण्यात आले आहे. एक आरोग्य कर्मचारी व दोन स्वयंसेवक, असे एकूण तीन व्यक्तीचा पथकात समावेश आहे. ही पथक घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची कामे करणार आहेत. ही माहिती शासनाच्या मोबाईल अॅपवर अपलोड करण्यात येणार आहे.या बाबतचे प्रशिक्षण टिम सदस्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहिम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टिने पाच ते दहा टिमच्या मागे स्थानिकस्तरावर पर्यवेक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे. मोहिमेचे जिल्हास्तरावरून सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान एसपी दोन तपासणे तसेच कॅडीशन आहे का, याची माहिती घेईल. ताप, खोकला, दम लागणे, एसपी दोन कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाºया व्यक्तींना जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये संदर्भित करण्यात येईल. फिव्हर क्लिनीकमध्ये कोविड - १९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील.को-मॉर्बीड कंडीशन असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का, याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीसाठी संदर्भित केले जाईल. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा दिली जाईल. घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समाजवून सांगितले जातील. लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहिम कोविड-१९ साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईलगृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार, अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण. या मोहिमेत भाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व आरोग्य शिक्षण संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रकमेचे बक्षिस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत बक्षिस मिळालेल्या व्यक्ती व संस्थांना जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या हस्ते, तर राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षिस देण्यात येणार आहेत. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेवून कोविडमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.
जिल्ह्यात ८६१ आरोग्य पथक करणार घरोघरी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 5:00 AM
गृहभेटीद्वारे संशयीत कोविड तपासणी व उपचार, अति जोखमीचे व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोविड-१९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, सारी-इली रुग्णांचे गृहभेटीद्वारे सर्वेक्षण, कोविड-१९ तपासणी आणि उपचार. गृहभेटीद्वारे प्रत्येक नागरीकांचे कोविडबाबत आरोग्य शिक्षण. या मोहिमेत भाग घेणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व आरोग्य शिक्षण संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन