शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

निराधार योजनेतील ८९ हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:07 PM

Bhandara : जिल्ह्यात फक्त पंधरा हजार महिलांना मिळणार लाभ

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा करण्यात आली. यात शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या १५०० पेक्षा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे म्हटले आहे. परिणामी भंडारा जिल्ह्यातील सरासरी ८९ हजार निराधार योजनेतील महिलाही या योजनेला आता मुकणार आहेत. संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत या निराधार महिलांचा समावेश असतो.

निराधार योजनेतील महिला लाभार्थी संख्यासंजय गांधी योजना - ३८,३२५इंदिरा गांधी योजना - २५,७९६श्रावणबाळ योजना - ४१,१८८ 

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर त्यात आता सुधारणा करण्यात आली आहे. योजनेची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रात गर्दी करीत आहेत. राज्य शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केल्यानंतर बुधवारी सेतू केंद्रात हवी तेवढी गर्दी दिसून आली नाही. मात्र, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वगळणार असल्याची चर्चा येथे ऐकावयास मिळाली. भंडारा जिल्ह्यातील हजारो महिला विविध निराधार योजनेचा लाभ घेत आहेत. राज्य शासनाच्या धोरणानुसार या योजनेतून निराधार महिला लाभार्थीही पात्र ठरणार नाहीत.

जिल्ह्यात संजय गांधी योजना अंतर्गत जवळपास ३८ हजार ३२५, इंदिरा गांधी योजना निराधार अंतर्गत सरासरी २५ हजार ७९६, तर श्रावण बाळ योजनेअंतर्गत जवळपास ४१ हजार १८८ निराधार महिला आहेत.

यापैकी यातील सरासरी १५ टक्के महिला या वयाची पासष्टी (६५) पार केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचाही येथे समावेश राहणार नाही. मात्र, २१ ते ६५ वयोगटांतर्गत जवळपास ८९ हजार ५१४ निराधार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुकणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांसह अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीतील महिला निराधार लाभार्थ्यांचा समावेश राहणार आहे.

यावरही निर्णय घ्यावामंगळवारी लाडकी बहीण योजनेच्या काही अटी राज्य सरकारने शिथिल केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संबंधीची घोषणा केली.योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट, आदींबाबत घोषणा करण्यात आली. मात्र, निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नाही. जिल्हा तसेच राज्यातही मोठ्या प्रमाणात विविध निराधार योजनेचे लाभ घेणाऱ्या लाखो महिला आहेत. किंबहुना निराधार योजनेच्या लाभात राज्य शासनाने वाढीची घोषणा करायला हवी होती किंवा योजनेत समावून घ्यायला हवे, असे या निराधार महिलांचे म्हणणे आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMaharashtraमहाराष्ट्रbhandara-acभंडारा