दिघोरी (मोठी) : शेतात मजुरीचे काम करण्यासाठी गेलेल्या महिला मजुरांवर वीज कोसळल्याने ९ महिला मजूर जखमी झाल्या. ही घटना तालुक्यातील दिघोरी/मोठी येथे सोमवारी दुपारी ३ च्यादरम्यान घडली. रिंकू सुभाष करंजेकर (वय ३०), प्रमिला माधवराव करंजेकर (५०), रज्जू प्रकाश करंजेकर (३५), उषा मार्कंड अवचट (३२), सुमित्रा देवराम सुषमा अवचट (६०), शालू केशव करंजेकर (३५), सुषमा रमेश करंजेकर (३५), सीमा रामेश्वर करंजेकर (४५), मंजू भागवत अवचट (३५, सर्व रा. दिघोरी मोठी) अशी जखमींची नावे आहेत.
सोमवारी सकाळी जवळपास ९ महिला गावातीलच मार्कंड अवचट नामक शेतकऱ्याच्या शेतावर मजुरी काम करण्यासाठी गेल्या होत्या. मजुरी काम करीत असतानाच दुपारी ३ च्यासुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊन वीज कोसळली. यात नऊ महिला जखमी झाल्या. घटनेची माहिती गावातील नागरिकांना होतात जखमी महिलांना दिघोरी/मोठी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. ९ जखमी महिलांपैकी रिंकू सुभाष करंजेकर व प्रमिला माधवराव करंजेकर गंभीर जखमी असून, अन्य ७ महिला मजुरांची प्रकृती समाधानकारक असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी सी. डब्ल्यू. वंजारी यांनी दिली. यापैकी रिंकू सुभाष करंजेकर यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे.
160821\img20210816161612.jpg
विजेच्या धक्क्यातील जखमी महिला उपचार घेताना