लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सेवेसाठी असलेल्या मिनी मंत्रालयात गुरूवारला दुपारच्या सत्रात ९० टक्के अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली. 'लोकमत'ने 'भंडारा पंचायत समिती वाऱ्यावर' या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपस्थितीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी खुर्चीवर आढळत नाही. त्यामुळे कामाचा खोळंबा होत असल्याची परिस्थिती 'लोकमत'ने बुधवारी पाहणी दरम्यान दिसून आली. त्यासंबंधीचे वृत्त गुरूवारला प्रकाशित झाले. त्यानंतर पंचायत समितितील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुरूवारला कार्यालयात उपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले. ग्रामसेवकांची मासिक सभा असल्यामुळे ग्रामसेवकांची हजेरी होती. गटविकास अधिकारी सत्येंद्र तामगाडगे सभेत हजर होते. सभापती व उपसभापती कक्षात कार्यकर्त्यांची हजेरी दिसून आली. शिक्षण विभागात दोन महिला कर्मचारी उपस्थित होत्या. लेखाविभाग, बांधकाम विभाग येथेही कर्मचारी दिसून आले. बुधवारला कुलूप बंद असलेले पशुसंवर्धन विभागाचे कक्ष आज खुले होते. या कक्षात येथे दोन कर्मचारी काम करताना दिसून आले. वित्त विभागात ग्रामसेवकांची सभा असल्यामुळे तिथे अधिक प्रमाणात गर्दी होती. पंचायत समितीच्या आवारात वाहनांची गर्दीही दिसून आली.अनेकांनी मानले लोकमतचे आभारभंडारा पंचायत समितीत दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी कर्मचारी कार्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या संबंधिचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी 'लोकमत'चे आभार मानले. तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात हीच परिस्थिती असल्याचेही 'लोकमत'ला सांगण्यात आले.
९० टक्के कर्मचाऱ्यांची पंचायत समितीत उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:55 PM
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील रहिवाशांच्या सेवेसाठी असलेल्या मिनी मंत्रालयात गुरूवारला दुपारच्या सत्रात ९० टक्के अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती दिसून आली. 'लोकमत'ने 'भंडारा पंचायत समिती वाऱ्यावर' या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपस्थितीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी खुर्चीवर आढळत नाही. त्यामुळे कामाचा खोळंबा ...
ठळक मुद्देआवारात दुचाकींची वर्दळ : ग्रामसेवकांनीही लावली हजेरी