लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्हा सहकारी बँकेशी ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्नित असून सर्व संस्थांच्या १ लाख ७० हजार ४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५ हजार ८२ सभासदांना कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली.यावेळी ते म्हणाले, जिल्हा बँकेमार्फत सर्व सभासदांना सहकारी संस्थांच्या मार्फतीने कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. संस्थेने कर्जाचे अर्ज बँकेत सादर केल्यानंतर छानणी करून सभासदाच्या सीसी लिमिट खात्यामध्ये मंजूर रक्कम जमा करण्यात येते. प्रत्येक सभासदाचे खाते शासकीय आदेशानुसार आधार व एटीएम कार्डशी जोडण्यात आले आहे.मंजूर रकमेपैकी दोन टक्के रक्कम शासकीय निर्देशानुसार सक्तीच्या पिकविमा प्रिमियमसाठी शिल्लक ठेऊन ऊर्वरीत सर्व रक्कम सभासद एटीएम कार्डद्वारे केव्हाही काढू शकतात. यात कोणतीही अडचण नसून या व्यतिरिक्त कोणतीही कपात करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना बँकेच्या कर्जवाटप योजनेत कोणताही त्रास नसून कोणतीही जाचक अट नाही. संस्थेचे सभासद व्हा, सातबारा आणा आणि कर्ज घ्या, एवढी सोपी पध्दत इतर कोणत्याही बँकेत नसल्याचे त्यांनी सांगितले.पिकविमा ही शासनाची सक्तीची योजना आहे. त्यात बँकेला कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. शेतकºयांनीच लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाच्या माध्यमातून सदर नियम शिथील करून घेणे योग्य राहील. जिल्हा बँकेने मागील आमसभेत सवार्नुमते ठराव मंजूर करून प्रधानमंत्री पीकविमा योजना ही शासनाची योजना असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सक्तीची न करता ऐच्छिक करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने शासनाकडे केली. परंतु शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय आला आहे.शेतकऱ्यांना मिळालेल्या १ लाख रुपयांपैकी दोन टक्के पिकविमा प्रिमियमची रक्कम बाजुला काढून ऊर्वरीत रक्कम प्रत्यक्ष सभासदाच्या सीसी लिमिट खात्याला जमा करण्यात येते. जेणेकरून एटीएममधून केव्हाही शेतकरी रक्कम काढू शकला पाहिजे. या हेतुने बँकेने ही प्रणाली विकसीत केली आहे. चालु हंगामात १० मेपर्यंत बँकेने १६ हजार सभासदांना ८० कोटी रूपयाचे पिककर्ज वाटप केल्याचेही फुंडे यांनी सांगितले.
९५,०८२ सभासदांना कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:45 AM
भंडारा जिल्हा सहकारी बँकेशी ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्नित असून सर्व संस्थांच्या १ लाख ७० हजार ४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५ हजार ८२ सभासदांना कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली.
ठळक मुद्देसुनिल फुंडे : जिल्हा बँकेचे कर्ज वाटप सर्वाधिक