भंडारा : शनिवारी मतमोजणी आपला भाऊ मैदान मारेल या उत्सूकतेपोटी आलेल्या कार्यकर्त्यांनी शेवट आनंदोत्सवाने साजरा केला. भंडारात कार्यकर्त्यांनी नरेंद्र भोंडेकरांच्या तर तुमसरात राजू कारेमोरे या भाऊंच्या यशाने आनंदोत्सव मनविला, तर साकोलीत निसटत्या विजयाच्या अंतराने नाना पटोले जिंकून आले. तेथेही कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
एकंदरीत कोण निवडून येणार याची चर्चा मतदान पार पडल्यानंतर सुरु झाले होते. दरम्यान राउंडनिहाय राजू कारेमोरे व नरेंद्र भोंडेकर यांनी आधीपासूनच आघाडी घेतली होती त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. साकोलीत राउंडनिहाय नाना पटोले आघाडीवर तर कधी ब्राम्हणकर समोर होते. त्यामुळे विजय कुणाचा होईल याबाबत संभ्रमता कायम होती. मात्र शेवटी पटोले यांचा विजय झाला.
मित्रपक्षांची साथ आपल्या विजयाचे सर्व श्रेय जनतेला, कार्यकार्त्यांना आणि मित्रपरिवाला आहे. त्यांचे परिश्रम मोलाचे आहेत. आपल्या विजयात लाडक्या बहिणींचाही सिहाचा वाटा आहे. या बहिणींना कुणी कमी समजू नये, असे आपण आधीपासूनच म्हणत होतो. पालकमंत्री स्थानिक असावा, ही आपली मागणी आजही कायम आहे. विकासाकामांसाठी ते आवश्यक आहे.
विजयाची कारणे गत अडीच वर्षात भंडारा-पवनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला ही भरीव बाब भोंडेकरांसाठी सकारात्मक ठरली. लाडकी बहीण योजनेचा फायदाही भोंडेकरांसाठी लाख मोलाचा ठरला.
हा मतदारांचा आर्शिवादच तुमसर मोहाडी विधानसभेत शिक्षण आरोग्य व रोजगाराला प्राधान्य देणारा असून येथील नागरिकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या मोठा लाभ मिळाला. लाडक्या बहिणीने मला आशीर्वाद दिले त्यामुळेच मी प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा निवडून आलो आहे.
विजयाची कारणे शेतकऱ्यांसह मतदारसंघात सर्वच बाबतीत कामांना विशेष प्राधान्य दिले. यात सर्वसामान्यांचा मूलभूत गरजांवर कारेमोरे यांनी फोकस केले. कार्यकत्यांची मजबूत फळी व केलेल्या कामांची जागृती करण्यात कारेमोरे यशस्वी ठरले.
कार्यकर्त्यांचा विजय मला मिळालेला विजय हा खच्या अर्थाने माझ्यासाठी साकोली मतदार संघात झुंजणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्या संघर्षांनच मला आमदार म्हणून जनतेने मला पसंती दिली. मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
विजयाची कारणे लोकनेता म्हणून प्रसिध्द असलेले नाना पटोले यांची ख्याती निवडणूकीत महत्वाची ठरली. तालुक्यात सांगण्यासारखे मोठे कार्य नसले तरी कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ नाना पटोलेंसाठी लाख मोलांची साथ ठरली.