शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

अंगणवाडीतच निघणार चिमुकल्यांचे आधारकार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:33 PM

अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देमाहितीही होणार आॅनलाईन : ‘टॅब व थंब’ मशीनचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना टॅबचे वितरण करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात टॅब वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेकांद कुझेर्कार, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजूषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती मनिषा कुरसंगे व जिल्हयातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांची उपस्थिती होती.भंडारा जिल्हयात अंगणवाडी व मिनी अंगणवाडींची संख्या १३०५ असून याकरिता जिल्हात सातही एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ४२ अंगणवाडी पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचे माध्यमातून एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी व मिनी अंगणवाडी मधील कामाचे व माहितीचे सनियंत्रण केल्या जाते.अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे कार्य डिजिटल व अधिक गतीमान व्हावे, अंगणवाडीमधील चिमुकल्यांची माहिती अदयावत राहावी व अंगणवाडीतील सर्व लाभार्थ्यांची माहिती आॅनलाईन नोंदणी करण्याच्या उदेश्याने टॅब व थंब मशीनचे वितरण करण्यात आले. यामध्ये लाईन लिस्टींग सॉफटवेअरच्या माध्यमातून माहितीचे आॅनलाईन संकलन करणे अगदी सूलभ होणार आहे.यापूढे रेकार्डवर लिहाव्या लागणाऱ्या माहितीचा त्रास वाचणार आहे. माहिती आॅनलाईन केल्यानंतर एका क्लीक वर संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे अद्ययावत माहितीचे संकलन करता येणार आहे. तसेच जन्माला आलेल्या बाळापासून तर ज्येष्ठापर्यंत आधारकार्ड हे सर्वांनाचा आवश्यक आहे. त्यामुळे अंगणवाडीत चिमुकल्या विदयार्थ्यांना आधारकार्ड काढता यावे याकरिता टॅबच्या सहायाने आधार कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.यापूर्वी अंगणवाडीस्तरावर ही सुविधा नसल्याने पालकांना इतरत्र पायपीट करावी लागत होती. पालकांना हा होणारा त्रास लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेऊन आधार कार्ड अंगणवाडीतच काढण्यासाठी टॅब व थंब मशिनचे वितरण करण्याचा महत्वपूर्ण राज्याच्या महिला व बालविकास विभागाने निर्णय घेतला. या सुविधेमुळे अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या माध्यमातून बालकांची आधार नोंदणी निु:शुल्क करण्यात येणार आहे.गुरूवारला पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकांना टॅब व थंब मशिनचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकांद कुर्झेकार, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजुषा ठवकर, महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे यांची उपस्थिती होती.