शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

कोरोनाच्या संकटातही तुमसरमध्ये टरबूजाचे भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

सध्या भाजीपाला फळांचे उत्पादन करण्याचा हा काळ आहे. योग्य खबरदारी घेऊन शेतकरी पिकांची जोपासना करीत आहे. तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावरील डोंगरला शिवारात राऊत कुटुंबिय आपल्या फळबागांची जोपासना करीत आहे. शेतावर आकस्मिक आ.राजू कारेमोरे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. डोंगरला येथे गोविंद राऊत, शंकर राऊत यांची आठ ते नऊ एकर शेती आहे.

ठळक मुद्देटरबूज व केळीची फळबाग : राऊत कुटुंबियांच्या परिश्रमाला यश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोनामुळे सर्व लॉकडाऊन आहे. परंतु शेतकरी या संकटातही शेतातील पिकांची योग्य काळजी घेत आहे. उन्हाळा सुरु झाल्याने सर्वच पिकांना पाण्याची सोय करावी लागत आहे.सध्या भाजीपाला फळांचे उत्पादन करण्याचा हा काळ आहे. योग्य खबरदारी घेऊन शेतकरी पिकांची जोपासना करीत आहे. तुमसर शहरापासून तीन किमी अंतरावरील डोंगरला शिवारात राऊत कुटुंबिय आपल्या फळबागांची जोपासना करीत आहे. शेतावर आकस्मिक आ.राजू कारेमोरे यांनी भेट देऊन पिकांची पाहणी केली. डोंगरला येथे गोविंद राऊत, शंकर राऊत यांची आठ ते नऊ एकर शेती आहे. शेतात त्यांनी टरबूज व तीन ते चार एकरात केळींची फळबाग लागवड केली आहे. तुमसर तालुका भात उत्पादक तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. दर्जेदार व गुणात्मक धानाची लागवड येथे करण्यात येते. परंतु परंपरागत पिकांसोबतच फळबाग लागवड करण्याचा निश्चय राऊत कुटुंबियांनी केला. याकरिता टरबूज व केळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याकरिता संबंधित फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपासून त्यांनी माहिती घेतली. प्रत्यक्ष त्या फळबागांना भेटी त्यांनी दिल्या.तीन एकरात केळीची फळबागदर्जेदार केळी पिकांचे बीज आणून त्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केली. तीन एकरात केळींची झाडे येथे बहरली आहेत. उर्वरीत शेतात टरबूज लागवड करण्यात आली.एका टरबूजाचे सुमारे १३ ग्राम इतके आहे. त्या टरबूजाला महाबली टरबूज असे नाव देण्यात आले. दिसायला महाकाय व वजनदार व तितकाच गोड रुचकर असा हा टरबूज आहे. नगदी पीक म्हणून युवकांनी फळबाग शेतीकडे वळण्याचे शेतकरी शंकर राऊत यांनी सांगितले. आमदार राजू कारेमोरे यांनी दिली भेट शुक्रवारी आमदार राजू कारेमोरे तालुक्यात संपर्काला जाताना त्यांनी शेतकरी गोविंद राऊत यांच्या शेतीा भेट दिली. यात टरबूज व केळीच्या पिकांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. शासकीय मदतीची गरज असल्यास तसे सांगावे असे आ.कारेमोरे यांनी राऊत कुटुंबियाला सांगितले. त्याच्यासोबत यावेळी देवचंद ठाकरे, रामदयाल पारधी, दिलीप बघेले, हरिश्चंद्र पटले, बनकर इत्यादी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या