लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे. या पावसाने व सिंचन सुविधांमुळे धान पिकाच्या रोवणीस काही प्रमाणात वेग आला आहे.भरपूर पावसाचे समजले जाणारे आर्द्रा व पुनर्वसू हे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने शेतजमिनील धान पºहे करपण्यास सुरूवात झाली होती. अनेक शेतकऱ्यांच्या रोवणीचे काम खोळंबले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी असताना २५ जूनपासून जिल्ह्यात पाऊस बरसला. गत पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यात किंचीत वाढ झाली आहे. जलसाठ्यात पाणी वाढल्यामुळे याचा फायदा खरीप हंगामातील धान पिकाला होणार आहे. शेतकरी मध्यंतरीच्या काळात पावसाच्या प्रचंड प्रतीक्षेत होता. दरम्यान अनेक गावांमध्ये पूजा-अर्चा करून वरूण राजाला पाऊस पडण्यासाठी साकडेही घालण्यात येत होते. मात्र पाऊस बरसत नव्हता. अखेर २५ जून पासून पाऊस सुरू झाला. संततधार पाऊस होत असल्यामुळे शेतजमिनीत रोवणी योग्य पाणी साचले आहे. ज्या शेतकºयांनी यापूर्वीच धान पिकाचे पºहे टाकले, त्यांचे पºहे सुध्दा रोवणी योग्य झाले आहे. जिल्ह्यातील भंडारा, लाखनी, साकोली, लाखांदूर, मोहाडी व तुमसर तालुक्यासह अनेक ठिकाणच्या शेतकºयांनी आपल्या शेतातील धान रोवणीच्या कामास प्रारंभ केला आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतीची कामे करण्यास मजूर मिळत नाही. मजुराची टंचाई भासते. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठे शेतकरी बाहेरगावावरून स्वत:च्या ट्रॅक्टरने महिला व पुरूष मजूर गावात आणून रोवणीच्या कामास वेग दिला आहे. ज्या गावात बहुतांश लोकांकडे शेतजमीन आहे, असे लोक स्वत:च्या शेतातील रोवणी आटोपल्याशिवाय दुसºयाच्या रोवणीच्या कामास मजूर म्हणून जात नाही. त्यामुळे बाहेरगावच्या मजुराचा आधार घेतला जात आहे.ट्रॅक्टरचे भाडे वाढलेधानपीक रोवणीसाठी चिखलणी करणे आवश्यक असते. ट्रॅक्टरने चिखलणीसाठी ७०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. ट्रॅक्टर मालकांना आता रोवणीच्या निमित्ताने सुगीचे दिवस आले आहे. झटपट रोवणी उरकण्यासाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. दोन वर्षात ट्रॅक्टरचे भाडे वाढले आहे.
जिल्ह्यात रोवणीच्या कामास वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 1:20 AM
जुलै महिन्यात २० ते २५ दिवसांत पावसाचा पत्ता नव्हता. सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. दरम्यान वरूणराजाच्या कृपेने गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस बरसत आहे.
ठळक मुद्देजलसाठ्यात किंचित वाढ : संततधार पावसाने शेतकरी सुखावला