‘सुरक्षितता मोहीम’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून एसटी आगार तुमसर येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक किरण चोपकर होते. तर प्रमुख उपस्थिती वाहतूक निरीक्षक रचना मसरके होत्या. राहुल डोंगरे पुढे म्हणाले अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकासाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्यासाठी आगार पातळीवर प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. प्रत्येक नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघात कमी होतील असे सांगितले. संचालन रचना मसरके यांनी केले. तर आभार ज्ञानेश्वर घाटोळे यांनी मानले. यावेळी आगारातील इस्त्राईल शेख सहा-वाहतूक निरीक्षक,प्रमोद बारई,कपिल लांबट,मनोज रोडके, सविता आडे, पंचशीला उके, चिंतामण बागडे, सुनील चोपकर, आरीफ शेख, मकसूद अली, भगवान दिवटे, शुक्ला आदींसह राज्य परिवहन आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
अपघात विरहित सेवा दया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:36 AM