नागपूर येथे ६ फेब्रुवारी रोजी त्यांच्या दुचाकीला एका कारने धडक दिली. त्यात ते जखमी होऊन बेशुद्ध झाले. त्यांना लगेच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तब्बल ११ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मरणांपरान्त त्यांचे नेत्रदान करण्यात आले. किराणा व्यावसायिक असलेल्या जगदीश ठक्कर यांनी १९९१-९२ या काळात पवनीचे नगराध्यक्षपद भूषविले. नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय ठक्कर व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष राजू ठक्कर यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या मागे पत्नी, कन्हया, रामू, शामू व गुड्डू ही चार मुले, दोन भाऊ, एक बहीण असा आप्तपरिवार आहे. वैजेश्वर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो पासपोर्ट