भंडारा : सायकलने रस्ता ओलांडत असताना झालेल्या अपघातात एका ७० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या घडली. लाखांदूर येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ हा अपघात झाला. पांडूरंग डोमा नाकतोडे (७०, लाखांदूर) असे घटनेतील मृत इसमाचे नाव आहे.
पांडूरंग नाकतोडे हे आपले काही कामकाज आटोपून सायकलने रस्ता ओलांडत होते. याच वेळी साकोलीकडून वडसामार्गे तांदूळ घेऊन जाणाऱ्या टेम्पोची (एमएच ३४ एबी ६६३५) धडक त्यांना बसली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.वृद्धाचे नियंत्रण सुटले, अन् घडला अपघातप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सायकलने रस्ता ओलांडणाऱ्या पांडूरंग नाकतोडे यांचे अचानकपणे सायकलीवरून नियंत्रण सुटले. हे लक्षात येताच टेम्पो चालकाने पूर्णतः वाहन नियंत्रणात आणले, मात्र सायकलस्वार अचानकपणे टेम्पोसमोर आल्याने जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की, चारचाकी वाहनाच्या समोरील काच फुटली.