कोट
१ वृत्तपत्रातून अचूक आणि विश्वसनीय माहिती तर मिळतेच. मात्र आज भंडाऱ्यासारख्या छोट्या जिल्ह्यातून राज्यस्तरावर तीन
शेतकऱ्यांनी राज्य स्तरावर राज्य पुरस्कार प्राप्त केले. यासाठी कृषी विभागासोबतच लोकमतने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करीत, नवनवीन माहिती देत नेहमीच शेतकऱ्यांच्या पंखातही बळ देण्याचे काम केले आहे.
मिलिंद लाड,
उपविभागीय कृषी अधिकारी
कोट २
समाजातील सर्वच घडामोडींचे वास्तव चित्र मांडणारे वृत्तपत्र म्हणून लोकमतने चांगला नावलौकिक कमावला आहे. कोरोना संसर्गाची भीती कमी करण्यापासून सोशल मीडियावरील फसव्या अफवांपासून नागरिकांना सावध ठेवण्यासाठी लोकमतने कठीण काळातही समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. सर्व सामान्यांपासून ते समाजातील तळागाळातील लोकांसाठी लोकमतची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहते. कार्यालय असो किंवा नसो मी आजही नियमित लोकमत वृत्तपत्राचे वाचन आवर्जून करतोच.
विजय नंदागवळी,
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, भंडारा.
कोट ३
मोबाईलच्या अतिवापराने दुष्परिणाम होतात. वृत्तपत्र वाचनातून वाचकांना खरी माहिती मिळत असल्याने अनेकांच्या मनातील संभ्रम दूर होतात. त्यामुळे आजही माझ्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनानेच होते. वृत्तपत्रातून सकारात्मक, यशाचे शिखर गाठणाऱ्या यशोगाथा वाचायला मिळतात. त्यामुळे मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. सकाळ झाली की लोकमतची आठवण होतेच.
प्रदीप म्हसकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रंण निरीक्षक, भंडारा
कोट ४
कोरोनाचा सर्वच व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. मात्र तरीही शेती व्यवसायामध्ये होत असलेल्या आमूलाग्र बदलांमध्ये तसेच भाजीपाला क्षेत्रात वाढ होण्यास लोकमतच्या यशोगाथांनी शेतकऱ्यांचे मन जिंकले आहे. यासोबतच खरी अचूक माहिती व सर्वसान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकमतने नेहमीच प्राधान्य दिले आहे. दररोज सकाळी नियमितपणे लोकमतचे वाचन करणे ही माझी नित्याची सवय बनली आहे.
शांतीलाल गायधने, तंत्र अधिकारी, कृषी उपविभाग, भंडारा