प्रशांत देसाई।आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषदेतील एका विभागात कार्यरत कर्मचाऱ्याची नित्याने नवनवीन प्रकरण समोर येत आहे. या कर्मचाºयावर दोन प्रकरणात निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान ‘लोकमत’ने कामाच्या सेटिंगबाबत दोन दिवसांपासून मालिका लावली आहे. वृत्त प्रकाशित होत असल्याने स्वत:ला वाचविण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्याने धडपड चालविली आहे. दरम्यान ‘तो’ कर्मचारी कोण ही उत्सुकता येथील सर्व कर्मचाऱ्यांना लागली आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत पडलेल्या कर्मचाऱ्याच्या फाईल्स सीईओंनी ‘झिरो पेंडेंसी’ उपक्रमांतर्गत पूर्णत्वाचा धडाका लावला आहे. अधिकाºयांच्या पुढाकारातून अनेक कर्मचाऱ्यांना मागील अनेक दिवसांपासूनचा थकीत आर्थिक मोबदला मिळाला आहे. असा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदमध्ये राबविला जात असतानाच येथीलच एका विभागातील कर्मचाºयाने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी सांभाळून अंतिम टप्प्यात असलेल्या फाईल्स स्वत:च्या ताब्यात घेतल्या. या माध्यमातून सर्व फाईल्सधारक कर्मचाऱ्याना फोनद्वारे त्यांचे काम ‘फत्ते’ करण्याकरिता पैशाची मागणी करण्याचा प्रकार सुरु केला. ही बाब महिला कर्मचाऱ्यासंदर्भात घडत असल्याने या कनिष्ठ कर्मचाऱ्याप्रती सर्वत्र रोष व्यक्त होत आहे.कामांच्या सेटिंगच्या मोबदल्यात आर्थिक तडजोड करावी, अशी मागणी होत असल्याने ‘लोकमत’ने दोन दिवसापासून हा प्रकार लावून धरल्याने संबंधित कर्मचाऱ्याचे धाबे दणाणले असून अनेकांना अद्यापही ‘तो’ कर्मचारी कोण? ही भूमिका उत्सुकतेकडे नेणारी आहे. दरम्यान ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेमुळे जिल्हा परिषदचे वरिष्ठ अधिकारी या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने ‘तो’ कर्मचारी कोण? याची चाचपणी सुरु केली आहे.दरम्यान या प्रकरणातून स्वत:ला वाचविण्यासाठी ‘या’ कर्मचाऱ्याने धडपड सुरु केली आहे. समाज संघटनेच्या माध्यमातून एका कथीत पदाधिकाऱ्याने रविवारला सकाळी प्रस्तुत प्रतिनिधीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रकरण थांबविण्याची गळ घातली.‘या’ कर्मचाऱ्याने त्याच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळूनच हा प्रकार सुरु केल्याचे आता याच विभागातील कर्मचारी चर्चा करीत आहेत. मागील काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी यांनी या कर्मचाऱ्याकडे विविध प्रकारच्या कामांचा भार दिला. मात्र त्याच्या ‘सेटिंग’ स्वभावामुळे कार्यालयातीलच अन्य सहकाऱ्यांनी त्यांच्या विभागप्रमुखाला त्याच्याकडून प्रभार काढण्याची मागणी केली होती. मात्र त्याला न जुमानता त्याच्याकडेच कामाचा भार देण्यात विभाग प्रमुखाने स्वारस्य दाखविले आहे, हे विशेष.गैरव्यवहार प्रकरणी दोषी आढळल्याने दोनदा निलंबनजिल्हा परिषद भंडारा येथे रूजू होण्यापूर्वी हा कर्मचारी मोहाडी तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना तेथील गैरव्यवहाराचा ठपका त्याच्यावर करण्यात आला होता. यात तो दोषी आढळल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्याची जिल्हा परिषदेच्या एका हायस्कुलमध्ये बदली करण्यात आली. तिथे विद्यार्थिनींच्या एका प्रकरणात दोषी आढळून आल्याने त्याच्यावर दुसºयांदा निलंबनाची कारवाई केली. दुसºया निलंबनाच्या कारवाईनंतर या कर्मचाºयाची साकोली पंचायत समितीमध्ये बदली करण्यात आली होती. त्यानंतर आरक्षणाच्या बळावर या कर्मचाºयाला जिल्हा परिषद येथे पदोन्नतीवर पाठविण्यात आले. असा या कर्मचाऱ्याचा पूर्व इतिहास असल्याने या कर्मचाºयावर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.