लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले. तहसीलदारांच्या तक्रारीवरुन करडी पोलिसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई तहसीलदार सुर्यकांत पाटील व त्यांच्या सहकार्यानी केली.मुंढरी बु. पासून पाच किंमी अंतरावर असलेल्या देव्हाडा, बेटाळा, नरसिंगटोला आदी रेती घाट आहेत. शनिवारला करडी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या व मुंढरी बुज नजिकच्या नदीपात्रातून रेतीची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने मोहाडीचे तहसीलदार सुर्यकांत पाटील व त्यांचे सहकारी तपासणीसाठी नदी रेतीघाटावर पोहोचले. यावेळी जेसीबी, टिप्परच्या सहायाने रेतीचा भरणा होत असल्याचे दिसून आले. यावेळी रात्रीचे ८.३० वाजले होते.यावेळी मुंढरी बुज येथील आशिष चौरागडे, जेसीबी चालक व मालक, टिप्पर वाहनाचे चालक व मालकाने तहसीलदार पाटील यांच्यासोबत वाद घातला तसेच संगणमत करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी अंदाजे दोन ब्रास रेती चोरी करुन नेली. याप्रकरणी तहसीलदार पाटील यांच्या तक्रारीवरुन आशिष चौरागडे व अन्य दोन्ही मालक व चालक विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा. फौजदार कटरे करीत आहेत.तस्करांचा धुमाकूळरेतीच्या चोरट्या वाहतुकीवर पोलिस, महसूल विभागाने निगरानी वाढविल्यानंतर आता रेती चोरट्यांनी आपला मोर्चा तुमसर तालुक्यातील अन्य रेती घाटाकडे वळविला आहे. मागील १५ दिवसांपासून दररोज पहाटे आठ ते दहा ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेतीचा उपसा केला जात आहे. चारगाव-देव्हाडी रस्त्यालगत रेतीची साठवणूक केली जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. याशिवाय मोहाडी तालुक्यातील रोहणा, बेटाळा, रोहा, मोहगाव देवी, पाचगाव, नेरी या घाटातून रेतीची सर्रास चोरी केली जाते. मात्र या घाटांकडे महसूल व पोलिस विभागाचे लक्ष असल्याने रेतीचोरांना या घाटातून रेतीची चोरी करताना त्रास होत आहे.
तहसीलदारांची रेतीघाटावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 9:26 PM
वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच मोहाडी चे तहसीलदारांनी वेळीच दखल घेवून घाटावर धडक कारवाई केली. यात रेती तस्करांवर कारवाई करुन साहित्य जप्त केले.
ठळक मुद्देरेती केली जप्त : करडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल