शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महिनाभरात ३०५ वाहनधारकांविरुध्द कारवाई

By admin | Published: July 06, 2015 12:36 AM

शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी

४५ हजारांचा दंड वसूल : बेशिस्त वाहन चालकांना लगाम, पार्किंगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरजभंडारा : शहरातील गजबजलेल्या व वर्दळीच्या मार्गावर बेशीस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहीम राबविली जात आहे.या अंतर्गत महिन्याभरात ३०५ जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण ४५ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, अरुंद रस्ते, सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी, तुरळक अपघात अशी एकूणच शहरातील रहदारीचे व वाहतूक व्यवस्थेचे चित्र आहे. शहरातील गांधी चौकापासून बसस्थानक परिसरापर्यंत मुख्य मार्ग गेलेला आहे. याच मार्गावर गांधी चौकात गुजरी यालाच छोटा बाजार असे संबोधले जाते. नगरपालिका, पोलीस ठाणे, जिल्हा बँक तसेच समोर किराणा व कापड बाजार आहे. या मार्गावर शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. बसस्थानक व जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयामध्ये जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. शालेय विद्यार्थी, कर्मचारी व अन्य नागरिक याच मार्गाने मोठ्या प्रमाणात रहदारी करतात. मोठ्या बाजारापासून गांधी चौकापर्यंतच्या मार्गावर दुकाने असलेल्या व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ग्रामीण भागातून तसेच शहरातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची या दुकानांमध्ये नेहमीच गर्दी असते. परंतु दुचाकी व कारने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्कींगची व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने अस्ताव्यस्त उभी करून ठेवली जातात. या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी व अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून वाहतूक पोलीस विभागातर्फे ३ जून पासून विशेष मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यात रस्त्यावर बेशीस्तपणे उभ्या ठेवल्या जाणाऱ्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. तीन आसनी आॅटो व गाड्यांना जॅमर लावून चालकाकडून ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. तर रस्त्यावर आढळलेल्या दुचाकींना जॅमर लावण्यानंतर टोविंगची कारवाई करून दुचाकी चालकावर दीडशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. वाहतूकीचा अडथळा व अपघात होईल अशा पद्धतीने रस्त्यावर वाहन उभे करून ठेवल्याप्रकरणी १०० रुपये दंड तर वाहन जप्त केल्याप्रकरणी ५० रुपये असा दीडशे रुपये दंड आकारण्यात आला. वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून काही त्रुटी आढळल्यास अधिक दंड वसुल केल्या जात आहे. दोन पोलीस कर्मचारी या मोहीमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कंत्राटी तत्वावर वाहन उचलण्याचे काम दिले जात आहे. दुचाकी प्रमाणेच चारचाकी वाहनचालकांवरही अशा प्रकारची कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु वाहतुक पोलीस विभागाकडे क्रेनची व्यवस्था नाही. अपघातग्रस्त वाहने उचलण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करून गृहविभागाकडे क्रेनची मागणी करण्यात आली. दोन वर्षापासून ही मागणी पूर्ण झालेली नाही. टोविंगची कारवाई करण्यापूर्वी शिट्टी वाजवून चालकांना पूर्व सूचना दिली जाते. परंतु तरीही दुर्लक्ष करणाऱ्या चालकांची वाहने उचलली जातात. काही दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर ही मोहीम राबविली जाणार आहे. वाहने उचलण्याची कारवाई सुरु झाल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करून ठेवणाऱ्या नागरिकांमध्ये बरीच सुधारणा झाल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)शहरात पार्किंगचा अभावशहरातील मुख्य बाजारपेठेत कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. या मार्गावर मोठे मोठे व्यापारी संकुले आहेत. खासगी इमारती, बँका व सरकारी कार्यालयासाठी ही संकुले भाड्याने दिली आहेत. परंतु एकाही ठिकाणी पार्कींगची व्यवस्था नाही. येथे येणारे नागरिक आपली वाहने सुरक्षितपणे उभी ठेवण्यासाठी जागा नसल्याने ती वाहने रस्त्यावर उभी ठेवतात. त्यानंतर अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत आहेत. कारवाईनंतर व्यापारी या विषयावर ब्र सुद्धा काढत नाही. मग वाहनचालकांनी वाहने कुठे ठेवावी असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या मार्गावर स्वत: नगरपालिकेमार्फत बीओटी तत्वावर बांधलेले व्यापारी संकुल आहे. तिथेही वाहनतळ नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या काळात बेधडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मोठ्या बाजारातील शंभर मिटरच्या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. या जागेवर पार्कींगची व्यवस्था झाल्यास नागरिकांना सोईचे झाले असते. परंतु पालिकेच्या अनास्थेमुळे ही समस्या अद्याप कायम आहे. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वाहतूकीची होणारी कोंडी सोडविण्यासाठी कोणते प्रयत्न करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.